वर्धा: शासकीय सेवेत असूनही परत स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करीत पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेल्या भावना यांना स्वप्नपूर्ती झाल्याचे समाधान वाटते. सध्या त्या वन विभागाच्या हिंगणी क्षेत्रात वनरक्षक म्हणून कार्यरत आहेत. २०१७ ला विज्ञान पदवीधर झालेल्या वैद्य यांनी लहानपणापासून पोलीस अधिकारी व्हायचे ध्येय ठेवले होते. पहिल्या प्रयत्नात यशस्वी.
मात्र वन खात्यात निवड झाली. हा सुद्धा आव्हानात्मक कामाचा भाग असल्याने इतर कार्यालयीन नौकरी पाहण्याचा सल्ला त्यांना अनेकवार मिळाला. मात्र जिद्द होती. महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवर असणाऱ्या एका लहान खेड्यात सातवी पर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर वन खात्यात असणाऱ्या काकांच्या घरी नागपुरात पुढील शिक्षण झाले. हा प्रवास सोपा नव्हता. घरची बेतास बेत स्थिती असल्याने कुठलेच अपयश परवडन्या सारखे नव्हते. म्हणून शिक्षण, स्पर्धा परीक्षा या टप्प्यावर मेहनत घेत यशस्वी वाटचाल केली. वैद्य म्हणतात की आता इच्छित नौकरी मिळाली आहे.
हेही वाचा… नागपूर: इन्स्टाग्रामवरील मित्राकडून तरुणीचा विनयभंग
दोन लहान भाऊ पण शिकत आहे.त्यामुळे जबाबदारी आहेच.आजवर काका काकूंनी सांभाळच नव्हे तर प्रोत्साहन दिल्यानेच पुढे येवू शकल्याची कृतज्ञता त्या व्यक्त करतात.पोलीस खात्याची नौकरी आव्हान देणारी असली तरी मनासारखी मिळाल्याने यशस्वी ठरणारच, असा निर्धार वैद्य व्यक्त करतात. लेडी सिंघम म्हणून चमकायला आवडेल का, यावर त्या हसत विचारतात, का नाही?