नागपूर : कलावंत केवळ तुम्हीच नाही तर आम्हीही राजकारणातील कलावंतच आहोत. सत्तांतरणाच्या प्रक्रियेत आम्ही मुंबई मार्गे सुरत आणि गुवाहाटी असा प्रवास नाट्यमयरित्या केला. त्यावरही आता नाटकाची संहिता लिहिली गेली पाहिजे, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त उदय सामंत यांनी केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नागपूर शाखेच्यावतीने आयोजित पुरस्कार समारंभात सामंत बोलत होते. राष्ट्रभाषा प्रचार सभेच्या बाबुराव धनवटे सभागृहात बुधवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला अखिल भारतीय हिंदी संस्था संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजय पाटील, सतीश पावडे व नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे, शेखर सावरबांधे, नरेश गडेकर उपस्थित होते.

Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
congress leader rahul gandhi made serious allegations on pm modi in jharkhand
पंतप्रधान बड्या उद्योजकांचे हित जोपासतात; राहुल गांधी यांचा आरोप
goa cm pramod sawant
Pramod Sawant: महायुती की महाविकास आघाडीच्या काळात उद्योग महाराष्ट्राबाहेर? मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
Two brothers from the village farmed saffron together Earn lakhs of rupees
Success Story: खेड्यातील दोन भावांनी मिळून केली केशरची शेती; वर्षाला कमावतात लाखो रुपये

हेही वाचा – शरद पवारांचे विश्वासू अनिल देशमुखांचा अदाणींच्या खाणीला विरोध, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र

यावेळी रंगमंचावर आयुष्य घालवणारे ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते अरविंद पाठक यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी उदय सामंत म्हणाले. नाटकात काम करण्याची संधी मिळाली नसली तरी राजकारणात आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची नाटके करावी लागतात. नाट्य परिषदेचा विस्तार आणि संघटनेत कलावंतांना मानाचे स्थान मिळाले पाहिजे. आता संघटनेच्या दृष्टीने नागपूरचे पालकत्व मला मिळाले आहे. त्यामुळे संघटनेला आणि नाट्य परिषदेला काहीही कमी पडणार नाही. नागपुरात ९९ वे संमेलन पार पडले. आता शंभरावे नाट्य संमेलन भव्य केले जाणार आहे. त्यात नागपूरच्या नाट्य शाखेला महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार आहे.

मराठी नाट्य संमेलनाप्रमाणे राष्ट्र भाषेचेदेखील संमेलन व्हायला हवे. आज महाराष्ट्राला राष्ट्रभाषेतील रंगभूमीने अनेक कलावंत दिले आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषद हा आमचा एक स्वतंत्र पक्ष आहे. मी आजपर्यंत कुठल्याही पदाधिकाऱ्यांना तुमचा पक्ष कोणता हे विचारले नाही. शरद पवार हे नाट्य परिषदेचे प्रमुख विश्वस्त आहे. शरद पवार दुसऱ्या विचारांचे आहे आणि मी दुसऱ्या विचारांचा आहे. मात्र, आम्ही संपूर्ण समन्वय ठेऊन काम करतो, असेही सामंत म्हणाले. बापू चनाखेकर अजय पाटील यांचे यावेळी भाषण झाले. प्रास्ताविक नरेश गडेकर यांनी तर संचालन वैदेही चवरे-सोईतकर यांनी केले.

या कलावंतांचा गौरव…

यावेळी रूपाली मोरे यांना श्रेष्ठ रंगकर्मी पुरस्कार, ज्येष्ठ रंगकर्मी अनिल उपाख्य बापू चनाखेकर यांना रंगसेवा पुरस्कार, सर्वोत्कृष्ट नाट्य लेखक पुरस्कार आनंद भीमटे, गणेशकुमार वडोदकर यांना सर्वोत्कृष्ट बालनाट्य लेखक पुरस्कार, झाडीपट्टी ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कार अमरकुमार मसराम यांना, झाडीपट्टी श्रेष्ठ रंगकर्मी पुरस्कार वर्षा शुक्ल (गुप्ते) यांना, संजय वलिवकर यांना ज्येष्ठ रंगकर्मी पुरस्कार तर मंदार मोरोणे यांना नाट्य समीक्षा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा – महामार्गावरील ढाब्यांवर मद्याचे अड्डे; ढाबाचालकांकडून बस चालकांना प्रलोभने, अपघात नियंत्रण कसे?

नाट्य परिषदेला क्रिकेट बोर्डाचे नियम हवेत

नाट्य संमेलनात काही निर्माते व कलावंत आपल्या नाटकांचे प्रयोग लावतात. यावर बंधन असायला हवे. त्यासाठी नाट्य परिषदेमध्ये क्रिकेट बोर्डाचे काही नियम लावणे गरजेचे आहे, असेही सामंत म्हणाले.