अमरावती: राज्यातील अनेक उद्योग गुजरातला पाठवण्याची जणू स्पर्धा राज्य सरकार च्या नेत्यांमध्ये लागली आहे. हिरे उद्योगापाठोपाठ आता महानंद दुग्ध प्रकल्पही गुजरातच्या दावणीला सरकारने बांधला आहे. यामुळे जर महाराष्ट्राचा विकास होईल, असा कुणाचा समाज असेल तर महायुतीच्या नेत्यांनाच एकदाचे गुजरातला घेऊन जा, म्हणजे काय तो विकास होईल, असा उपरोधिक सल्ला काँग्रेसच्या आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.

काही दिवसापूर्वी मुंबईतील हिरे उद्योग गुजरात मधील सुरत येथे नेण्‍यात आला. महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रकल्प हळूहळू गुजरातला स्थलांतरित होत आहे. त्यामुळे आधीच बेरोजगार असलेल्या युवकांच्या संख्येत मोठी भर पडत आहे. अशातच राज्य सरकारने महानंद हा सहकारातला दुग्ध व्यवसायातील शिखर प्रकल्प गुजरातच्या दावणीला बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प ‘एनडीडीबी’ योग्यरीत्या चालवेल आणि पुन्हा महाराष्ट्राला परत देईल, असा भाबडा आशावाद राज्याचे दुग्धविकास मंत्री व्यक्त करीत आहेत. वास्तविक केंद्रात एनडीए सरकार आणि राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून सहकारी संस्था मोडीत काढल्या जात आहेत. शंभर वर्षांहून अधिक सहकाराची वैभवशाली परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील सहकाराचे जाळे मोडून काढण्याचा चंगच या सरकारने बांधला आहे. जागतिक मंदीच्या काळातही गेल्या काही वर्षात ज्या सहकारामुळे महाराष्ट्र तग धरू शकला. तो सहकारच सरकार अशा पद्धतीने उध्वस्त करीत आहे. असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला.

Property tax defaulters properties seized in Titwala
टिटवाळा येथे कर थकबाकीदारांच्या दोन कोटीच्या मालमत्तांना टाळे, पालिकेच्या अ प्रभागाची कारवाई
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर
State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
Devendra Fadnavis, Ajit Pawar, Eknath Shinde ,
खातेवाटपाच्या पेचामुळे दोन उपमुख्यमंत्री बिनखात्याचे

हेही वाचा… सायबर क्राईमच्या नाना तऱ्हा, यवतमाळ जिल्ह्यात ५३ सायबर गुन्ह्यांची नोंद

सहकारातील एकही संस्था चालवण्याचा अनुभव आणि कुवत नसलेल्या या सरकारने महानंद प्रकल्पही गुजरात मध्ये नेऊन ठेवला. दिल्लीश्वरांची तळी उचलण्यात राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री धन्यता मानत आहेत. अशा पद्धतीने महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरात मध्ये नेऊन जर महाराष्ट्राचा विकास साध्य होणार आहे, असे कोणाला वाटत असेल तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनाच गुजरातला नेऊन ठेवावे, म्हणजे एकदाचा काय तो विकास होईल, अशा शब्दात ॲड.ठाकूर यांनी टोला लगावला आहे.

Story img Loader