अमरावती : जिल्ह्यात काही संघटनांकडून त्रिशूळाचे वाटप करण्यात येत आहे. पण, हे त्रिशूळ नसून गुप्तीसारखे शस्त्र आहे. या सर्व गोष्टी तत्काळ थांबवल्या गेल्या पाहिजेत, अन्यथा भविष्यात हिंसक घटना घडण्याची भीती आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थाच धोक्यात आली आहे, असा आरोप काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. पत्रकारांशी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या, त्रिशूळाचे वाटप काही संघटनांकडून करण्यात येत असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. अद्याप यासंदर्भात आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही, पण पोलिसांनी तत्काळ स्वत:हून या घटनांची दखल घेऊन संबंधितांच्या विरोधात गुन्हे दाखल केले पाहिजे. एकीकडे, राज्यात बांगलादेशी शिरले असल्याचा आरोप भाजपचे नेते करीत आहेत. राज्यात तर भाजपचेच सरकार आहे. या राज्यात कायदा व सुव्यवस्था कडक असताना बांगलादेशी घुसखोर शिरलेच कसे, असा सवाल यशोमती ठाकूर यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा