लोकसत्ता टीम

अकोला : नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या सातपुडा पर्वतात दरवर्षी श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी धारगडमध्ये यात्रा महोत्सव भरतो. निसर्ग सौंदर्य आणि आध्यात्माचा सुरेख संगम असलेला हा महोत्सव १८ व १९ ऑगस्टला होत आहे. शिवभक्तांचे आराध्य दैवत श्री क्षेत्र धारगड येथे ‘हर हर बोला महादेव’ च्या गजरात हजारो भक्तगण रविवारपासून येथे दाखल होण्यास सुरुवात झाली.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Devendra Fadnavis claims that Ladaki Bahin Yojana will benefit everyone without discrimination
धर्मभेद न करता लाडकी बहीण योजनेचा सर्वांना लाभ; देवेंद्र फडणवीस यांचा दावा
Thirumayam Fort
‘या’ किल्ल्यावरील अंडाकृती खडकाखाली दडलंय काय?
sixth mass extinction earth currently experiencing a sixth mass extinction
पृथ्वीवरील बहुतेक जीवसृष्टी नष्ट होण्याच्या मार्गावर? काय सांगतो ‘सहाव्या महाविलोपना’चा सिद्धान्त?
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
Vidarbha Marathwada passengers facing problem due to no train between Nagpur to Sambhajinagar
नागपूर संभाजीनगरला जोडणारी एकही रेल्वेगाडी का नाही

श्री क्षेत्र धारगड येथे प्राचीन शिवालय असून, हे सातपुड्याच्या पर्वत रांगामध्ये वसले आहे. समुद्र सपाटीपासून तीन हजार फुट उंचीवर नरनाळा किल्ल्याच्या छातीशी असलेल्या चार कोणी गुहामध्ये दोन स्वयंभू शिवलिंग व नंदी आहे. महादेवाचे हे शिवलिंग केव्हा व कसे निर्माण झाले, याचा कुठलाही ठोस पुरावा इतिहासात आढळत नाही. या बाबत आख्यायिका मात्र ऐकावयास मिळतात. संपूर्ण वऱ्हाड हे दंडकारण्यात समाविष्ठ होते. महाभारतकालिन राजकुमार एकलव्य यांच्या पित्याचा दंडकारण्यात अंमल होता. एकलव्य व त्यांचे पिता हे महादेवाचे निस्सीम भक्त होते. त्यांनीच या शिवलिंगांची स्थापना केली, अशी आख्यायिका आहे, तर दुसरी आख्यायिका अशी की नरनाळा किल्ल्याच्या सरदाराची पत्नी शिवभक्त होती. तिनेच सरदाराला शिवलिंग स्थापना करायला लावली असेही बोलले जाते. मात्र, याबाबत कुठलाही पुरावा इतिहासात आढळून येत नाही. या गुहेच्या काही अंतरावरच एक लहान भुयार असून येथे एक शिवलिंग व नंदी आहे.

आणखी वाचा-चंद्रपूर : खासदार प्रणिती शिंदे म्हणतात, ‘विरोधी पक्ष नेता आमचा मुख्यमंत्री…’

धारगड अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात असले तरी धारगडला जाण्याकरिता सोईस्कर मार्ग हा अकोला जिल्ह्यातील अकोटवरून आहे. त्यामुळे धारगड यात्रेचे खरे महत्त्व हे अकोटलाच दिसून येते. धारगडला जाण्यासाठी अकोट आगारातून बसेसची व्यवस्था करण्यात येते. त्यामुळे अकोटातील रस्ते भक्तांनी फुलून जातात. धारगड हे पूर्वी दुर्गम भागात होते. आता मात्र बसेस सोबत आपली खासगी वाहने सुद्धा धारगड टी पाईंटपर्यंत जाऊ शकतात. श्री क्षेत्र धारगड हे अकोट वरून पाऊल वाटेने जवळपास २५ किमी अंतरावर येत असून प्रमुख मार्गाने ३७ किमी दूर येते. बहुतांश शिवभक्त हे पाऊल वाटेनेच जाणे पसंत करतात.

पूर्णा नदीच्या जलानी भरलेली कावड खाद्यांवर घेऊन भक्तगण अकोटवरून पोपटखेड मार्गाने जातात. डफडीच्या तालावर ‘हर हर महादेव’ असा गजर करीत धारगड येथे पोहचतात व कावडीने आणलेल्या पूर्णा नदीच्या पाण्याने मोठ्या महादेवाच्या शिवलिंगावर जलाभिषेक करतात. तेथून काही भक्त लहान महादेवावर जातात. यावर्षी सुद्धा हा यात्रा महोत्सव १८ व १९ ऑगस्टला उत्साहात होत आहे. खटकाली तपासणी नाक्यापासून १८ ऑगस्टला सकाळी ८ वाजतापासून ते १९ ऑगस्टपर्यंत ३ वाजेपर्यंत प्रवेश सुरू राहणार आहे. १९ ऑगस्टला सायंकाळी ६ वाजेपर्यंत खटकाली नाका येथून भाविकांनी बाहेर निघणे बंधनकारक आहे. इतर दिवशी धारगड मंदिरात प्रवेश प्रतिबंधित आहे.

आणखी वाचा-जगभरात तांडव माजवणारी ‘ती’ ब्रम्हपुरीत आढळली…

नटलेला मनमोहक परिसर

श्री क्षेत्र धारगड येथे निसर्ग निर्मित धबधबा भक्तांवर जणू जलाभिषेक करतो. निसर्गाने बांधलेली भक्तांची पूजा प्रत्यक्ष अनुभवण्यासारखीच असते. भक्तीचा हा महापूर श्रावण महिन्यामध्ये पाहण्यासारखा असतो. सर्वत्र हिरवेगार वातावरण, नद्या-नल्यांमध्ये झुळझुळणारे पाणी, निसर्ग सौंदर्याने नटलेला मनमोहक सूर्या धबधबा व निसर्गाने परिधान केलेला हिरवा शालू यामुळे भक्तगणांना धारगडचे वेध लागतात.