यवतमाळ : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरुवात झाली आहे. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत जिल्ह्यातील अनेक महिलांच्या खात्यात दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत. आज शनिवारी या योजनेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अधिकृत सुरुवात होणार आहे. प्रशासन स्तरावर या योजनेतील भोंगळ कारभारही आता बाहेर येत आहे. यवतमाळ जिल्ह्यात एका पुरुषाच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा निधी जमा झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतर्गत राज्य सरकार प्रत्येक महिन्याला महिलांना एक हजार पाचशे रुपये देणार आहे. १५ ऑगस्टला दोन महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा झाले. पण जिल्ह्यातील आर्णी येथे ही रक्कम चक्क एका भावाच्या खात्यात जमा झाली आहे विशेष म्हणजे, या भावाने त्याच्या बहिणीसाठी, पत्नीसाठी ना कोणता अर्ज केला होता, ना कोणती कागदपत्रे दिली होती. तरीही, त्याला योजनेचा लाभ मिळाल्याने योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी बाहेर आल्या आहेत.

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
Nurses without pay for four months Mumbai print news
परिचारिका चार महिने वेतनाविना
sunetra pawar dhairyasheel mane on central textile committee
केंद्रीय वस्त्रोद्योग समितीवर धैर्यशील माने, सुनेत्रा पवार
eknath shinde comment ladki bahin yojana daryapur vidhan sabha
मुख्‍यमंत्री म्हणतात, मी शंभरवेळा तुरूंगात जाण्‍यास तयार…कारण…
Rajshree Ahirrao, Devalali, Mahayuti Devalali,
नाशिक : देवळालीत महायुतीतील मतभेद मिटता मिटेना, अजित पवार गटाविरोधात शिंदे गटाचा प्रचार

हेही वाचा…लोकसत्ता इम्पॅक्ट… गडचिरोली जिल्ह्यातील गायवाटप घोटाळाप्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्ता दोषी

आर्णी येथील जाफर गफ्फार शेख या तरुणाच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहेत. जाफर हे आर्णी शहरातील हाफीज बेग नगरातील रहिवासी आहेत. सुशिक्षित बेरोजगार असलेल्या जाफर शेख यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी कोणताही अर्ज भरला नव्हता आणि नियमानुसार त्यांना भरणे शक्यही नव्हते . तरीही त्यांच्या बँक ऑफ बडोदामधील खात्यात या योजनेचे तीन हजार रुपये शासनाने जमा केले आहे. जाफर यांना मोबाईलवर खात्यात तीन हजार रुपये जमा झाल्याचा संदेशही प्राप्त झाला. त्यानुसार जाफर यांनी तत्काळ बँकेत जाऊन आपले खाते तपासले असता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत त्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाल्याचे, बँक स्टेटमेंटमधून स्पष्ट झाले. या प्रकाराने खुद्द जाफरही चक्रावून गेले आहे. आपण अर्ज न करता आपल्या खात्यात ही रक्कम कशी जमा झाली, याची चौकशी केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया जाफर शेख यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यात चार लाख ६८ हजार अर्ज प्राप्त झाले. प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र चार लाख ६० हजार अर्ज महिलांच्या खात्यात निधी वितरणासाठी शासनास पाठविण्यात आले होते. यापैकी अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहे. मात्र पुरुषांच्या खात्यात पैसे जमा होत असल्याने प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराचा विरोधकांनी खरपूस समाचार घेतला आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे राज्य सरकारकडून मतदारांना आकर्षित करणाऱ्या योजनांची अशा घोषणा केली जात आहे. मुळात ही योजनाच फसवी आहे असा आरोप विरोधक करत आहेत.

हेही वाचा…गडचिरोली : ‘लोकसत्ता’चा दणका; वादग्रस्त वैद्यकीय अधिकाऱ्याची तिसऱ्या दिवशीच उचलबांगडी

बहीण आणि भाऊसुद्धा रांगेत!

एकीकडे राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा निधी बँक खात्यात जमा होणे सुरू झाले, आणि दुसरीकडे दोन दिवसांवर बहीण – भावाच्या पवित्र नात्याचा रक्षाबंधन हा सण आला आहे. बँकांमध्ये सध्या बहिणींनी लाडक्या भावाने पाठवलेले पैसे काढण्यासाठी तोबा गर्दी केली आहे. दुसरीकडे अनेक भाऊ आपल्या लाडक्या पत्नीने तिच्या भावाची राखी पोस्टाद्वारे पाठविण्यासाठी पोस्ट ऑफिस समोर रांगेत लागले आहेत.