लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
यवतमाळ: संपूर्ण राज्यात थैमान घातलेल्या अवकाळी पावसाने शुक्रवारी सायंकाळी यवतमाळ जिल्ह्यातही हजेरी लावली. यवतमाळ तालुक्यासह जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस कोसळला. या पावसामुळे गहू, हरभरा पिकांचे प्रचंड नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत पाऊस कोसळत होता. विदर्भ-मराठवाडा सिमेवर उमरखेड तालुक्यात काही भागात हलकी गारपीटही झाली. कृषी विभागाने अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
कृषी महोत्सवास फटका
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उत्पादक ते ग्राहक ही साखळी उपलब्ध व्हावी, नवनवीन कृषी तंत्रज्ञान माहिती व्हावे, कृषी क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन व्हावे आणि त्यांचा विरंगुळाही व्हावा, यासाठी यवतमाळ येथील समता मैदानात आजपासून कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. आज शनिवारी दुपारी कृषी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी या महोत्सवाकडे पाठ फिरविली. सत्तार यांचा दौरा रद्द झाल्याने पालकमंत्र्यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्याची वेळ आली आहे.
आणखी वाचा- गोंदियात वादळी वाऱ्यासह पाऊस, वीज पुरवठा काही काळ खंडित, पिकांचे नुकसान
शुक्रवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसाने या महोत्सवाच्या ठिकाणी दैनावस्था झाली. सर्वत्र पाणी साचून चिखल झाल्याने स्टॉलधारकांचे हाल झाले. कर्मचाऱ्यांचा संप आणि अवकाळी पावसाचा फटका अशा दुहेरी संकटात हा कृषी महोत्सव सापडला आहे. या कालावधीत राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले असतानाही कृषी विभागाने हा पाच दिवसीय कृषी महोत्सव कशासाठी घेतला, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. यवतमाळ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असताना येथील महोत्सवात हजेरी लावून कृषीमंत्री शेतकऱ्यांना बळ देतील अशी अपेक्षा होती, मात्र तीही फोल ठरली. त्यामुळे हा कृषी महोत्सव घेवून कृषी विभागाने मार्च महिना संपायच्या अधी निधी खर्च करण्याचा केवळ सोपस्कार तर केला नाही ना, अशी चर्चा महोत्सवात आहे.