यवतमाळ : पारधी आणि आदिवासी समाजातील मुलींकरिताच्या ‘आम्ही साऱ्या सावित्री’ या वसतिगृहातील ३३ चिमुकल्यांनी बाल वाचनालयाचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. एस.एल. फाऊंडेशनच्या प्रेरणा व पुढाकारातुन सुरु झालेल्या सेवा उपक्रमाची मुहुर्तमेढ नुकतीच झाली. वाचन प्रेरणा चळवळीतून व्यक्तिमत्व विकास तसेच गरजूंना रोजगार, स्वयंरोजगार मिळण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
पारधी फासेपारधी विकास बहुउद्देशिय संस्थेमार्फत २०१९ पासून वाघाडी येथील ‘आम्ही साऱ्या सावित्री’ हे पारधी व आदिवासी समाजातील मुलींसाठीचे वसतीगृह सुरू आहे. ईसु माळवे आणि पपिता माळवे हे दांमप्त्य सेवाभाव म्हणून या उपेक्षित, वंचित आणि दुर्लक्षित समाजातील चिमुकल्यांना शिक्षणासह संस्कार मिळावे तसेच त्यांचा सांभाळ करून त्यांच्या कुटुंबियांना आधार मिळण्याच्या दृष्टीने निरंतर प्रयत्न करीत आहेत. गतवर्षी जुलै महिन्यात मुसळधार पाऊस आणि पुरस्थितीने वसतीगृहाचे मोठे नुकसान झाले होते. यादरम्यान दाते कॉलेजमधील १९९४-९५ मधील विद्यार्थ्यांनी स्थापन केलेलया एस.एल. फाऊंडेशन या संस्थेने या वसतीगृहास मदतीचा हात दिला. वसतीगृहास किराणा, मुलींना शालेय साहित्य, खाऊ, कपडे, साहित्य वसतीगृहास देण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा