यवतमाळ : आर्णी येथे घराच्या छतावर पंतग उडविताना विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने बालकाचा मृत्यू झाला. अन्य एका घटनेत बाभूळगाव तालुक्यात तारेच्या कुंपणात सोडण्यात आलेल्या वीज प्रवाहाचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. रितेश संजय सुरजुसे (१३, रा. गांधीनगर आर्णी) व बाबाराव मारोती कुमरे (५५, रा. खडकसावंगा, बाभूळगाव) अशी मृतांची नावे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आर्णीतील गांधीनगर येथील रितेश हा रविवारी घराच्या छतावर पंतग उडवित होता. खांबावरून घरात वीजप्रवाह सोडलेल्या केबलच्या कापलेल्या भागास रितेशचा स्पर्श झाला. ला विजेचा जोरदार झटका बसला. जखमी अवस्थेत दवाखान्यात नेताना त्याचा मृत्यू झाला. रितेशला वडील नसून, मोठा भाऊ गतिमंद आहे. आई त्यांचा सांभाळ करते. रितेशच्या मृत्यूने रोजमजुरी करणाऱ्या सूरजुसे परिवारावर संकट ओढवले आहे. मागील १५ दिवसांत मांजामुळे गळा कापल्याने तिघेजण गंभीर जखमी झाले होते. आता पतंग उडविताना विजेचा धक्का लागल्याने बालकाचा मृत्यू झाल्याने पतंगीचा खेळ आयुष्याची दोरी कापत असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा :बुलढाणा : मंत्रीपद न दिल्याने कार्यकर्ते रस्त्यावर; ‘या’ आमदारांनी नागपुरातून ‘व्हिडीओ कॉल’ करुन…

दुसऱ्या घटनेत बाभूळगाव तालुक्यातील खडकसावंगा येथील शेतकरी बाबाराव कुमरे हे प्रतापपूर शिवारात गुरांसाठी चारा आणण्यासाठी गेले होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. रविवारी बाबाराव पिटकर यांच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळला. वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी कुंपणाच्या तारांमध्ये वीज प्रवाह सोडण्यात आला होता. त्यातील विजेच्या धक्क्याने बाबाराव यांचा मृत्यू झाल्याची तक्रार अरविंद कुमरे यांनी बाभूळगाव पोलीस ठाण्यात दिली.

हेही वाचा : Yavatmal Crime News: विद्यार्थिनी १० दिवसांपासून होती बेपत्ता, अखेर दगडाने ठेचलेल्या…

आंतरजातीय विवाह केलेल्या विवाहितेची छळामुळे आत्महत्या

महागाव तालुक्यातील मुडाणा येथे आंतरजातीय विवाह केलेल्या विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. पल्लवी विकास भुतेकर (२३) असे मृत महिलेचे नाव आहे. तिने पाच वर्षांपूर्वी विकास प्रकाश भुतेकर याच्यासोबत आंतरजातीय प्रेम विवाह केला होता. मात्र पतीसह सासरची मंडळी सतत मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याने तिने आत्महत्या केल्याची तक्रार तिचे वडील तुकाराम धोत्रे यांनी महागाव पोलीस ठाण्यात केली. त्यावरून पोलिसांनी पती विकास भुतेकर, सासरा प्रकाश भुतेकर, सासू प्रभा भुतेकर, दीर आकाश भुतेकर या सर्वांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. पती विकास भुतेकर व सासरा प्रकाश भुतेकर या दोघांना पोलिसांनी अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yavatmal crime updates boy electrocuted while flying kite touched electric wires in arni woman suicide in other incident nrp 78 css