यवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा ही यवतमाळची ओळख पुसून टाकण्यासाठी शासन, प्रशासन, विविध सामाजिक संस्था सातत्याने प्रयत्न करत असताना शेतकरी आत्महत्येचे मळभ अधिक गडद होत आहे. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यात तब्बल ४० शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. आज शुक्रवारी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे हे यवतमाळ जिल्ह्यात आहेत. ते या शेतकरी आत्महत्यांची दखल घेतात काय, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने होत्याचे नव्हते झाले. नदी – नाल्याच्या काठावरील शेतजमीन पूर्णपणे खरडून गेली आहे. आता शेतकर्‍यांकडे दुबार पेरणीचीही सोय नाही. पावसाने शेती खरडून गेल्याचा धसका घेऊन भविष्याच्या चिंतेत जुलै महिन्यात तब्बल २४ शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत १६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. अतिवृष्टीमुळे शेतकरी पुरता खचून गेला आहे. शेतात जे काही शिल्लक आहे. ते पीक वाचविण्याचा आटापिटा केला जात आहे. केवळ निंदण करण्यासाठी पैसे नसल्याने शेतकर्‍यावर आत्महत्या करण्याची वेळ येते, ही बाब शेतकर्‍यांची अवस्था किती वेदनादायी आहे, हे दर्शवित आहे.

Hundreds of minor boys and girls commit suicide due to exams stress and love affairs
अल्पवयीन मुला-मुलींच्या शेकडो आत्महत्या, परीक्षा, तणाव, प्रेमसंबंध अन्…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
SC to hear plea seeking safety measures for devotees at Mahakumbh on Feb 3
कुंभमेळ्यासंबंधी याचिकांवर आज सुनावणी
Sasoon Hospital Pune.
‘GBS’मुळे आणखी एक मृत्यू, पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयात नोंद; राज्यातील रुग्णसंख्या १२७ वर
Former MP Kisanrao Bankheles son commits suicide
माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्या मुलाची आत्महत्या
Suicide kota
Kota Suicide Case : कोटा येथे पुन्हा आत्महत्या सत्र! २४ तासांत दोघांनी संपवलं आयुष्य; महिन्याभरातील सहावी घटना!
Five peacocks and some birds died simultaneously in farm in Khairi near Kamathi
पाच राष्ट्रीय पक्ष्यांचा मृत्यू अन् बर्ड फ्ल्यू…
19 to 20 people die in road accidents every month
ठाणे : प्रत्येक महिन्यात १९ ते २० जणांचा रस्ते अपघातात मृत्यू

हेही वाचा : भंडारा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एलसीबीच्या जाळ्यात; दहा हजार रुपये लाच स्वीकारताना अटक

यंदा अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांना अतोनात नुकसान सहन करावे लागले. त्यामुळे या खरीप हंगामात आर्थिक संकट अधिकच गडद होण्याची चिन्हे आहेत. मंत्र्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांनी शेतशिवारात जाऊन पाहणी केली. प्रशासनाने पंचनामे करण्याचे आदेश अधिनस्थ यंत्रणेला दिले. प्रत्यक्षात यंत्रणा शेतकर्‍यांच्या बांधावर पोहोचलीच नसल्याचे वास्तव आहे. आणखी किती शेतकर्‍यांचे बळी जाईपर्यंत कागदी घोडे नाचविण्यात येणार, असा संतप्त सवालही शेतकर्‍यांकडून विचारला जात आहे.

निंदनास पैसे नसल्याने आत्महत्या

यवतमाळ तालुक्यात येणार्‍या येरद येथील तरुण शेतकरी मनोज राठोड याने दोन दिवसांपूर्वी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. त्याच्याकडेही बँकेचे कर्ज आहे. मात्र, शेतात तण वाढल्यावर निंदण करण्यासाठी पैसे नाहीत. त्याच्या वडिलांनी काही लोकांकडे उसनवारी पैशाची मागणी केली. कुठूनही पैसे मिळत नसल्याची बाब मनोजला समजली. आता कसे होईल, या विवंचनेत त्याने टोकाचे पाऊल उचलले.

हेही वाचा : ॲपल कंपनीने केले चार्जिंगबाबत खबरदार, अन्यथा होईल स्फोट

वर्षाला सरासरी ३०० आत्महत्या

२५ वर्षांपूर्वी सुरू झालेले शेतकरी आत्महत्येचे सत्र जिल्ह्यात अजूनही सुरूच आहे. रोज कुठे ना कुठे होणार्‍या आत्महत्येमुळे शेतकरी कुटुंब अनामिक भीतीच्या सावटात वावरत आहे. २००७ ते २०२२ या कालावधीत दरवर्षी सरासरी ३०० शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. या वर्षातही आठ महिन्यात १६० पेक्षा अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलल्याने हे संकट अधिक गडद झाले आहे.

Story img Loader