यवतमाळ : ‘लग्न हे भोगासाठी नसुनिया…’ हे शेवटचे मंगलाष्टक सुरू असतानाच वऱ्हाडी ‘हे लग्न नाही होवू शकत ‘ म्हणून आवाज आला आणि सारे अवाक झाले. प्रत्येकजण काय झाले याचा कयास बांधत असताना मुलगी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले आणि सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले. बुधवारी हा प्रसंग जिल्ह्यात दोन लग्न मंडपात घडल्याने बालविवाह जोमात सुरू असल्याचे स्पष्ट झाले.

यातील एक कार्यवाही मारेगाव तालुक्यातील पहापळ येथे तर दुसरी यवतमाळ तालुक्यातील गहुली हेटी या खेड्यात करण्यात आली. बुधवारी जिल्हा बालसंरक्षण कक्षात सकाळी एक निनावी फोन आला, ‘जिल्ह्यात दोन बालविवाह दुपारी १२:०५ वाजताच्या मुहर्तावर लागणार आहेत.’ अशी माहिती या फोनद्वारे मिळाली. ही माहिती कळताच कक्षातील यंत्रणेने लगेच दोन्ही उपवधूंच्या वयाची शहानिशा केली असता दोघीही अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. या दोन्ही गावांकडे तात्काळ पथके रवाना झाली. मंगलाष्टके सुरू असतानाच ही पथके दोन्ही लग्न मांडवात धडकली आणि दोन बालविवाह रोखण्यात यश आले.

Pimpri, vote oath, marriage ceremony, marriage,
पिंपरी : आधी मतदानाची शपथ… नंतर विवाह सोहळा…
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
maori leader protest in newzealand
विधेयकाचा निषेध म्हणून महिला खासदाराचा ‘वॉर डान्स’; कुठल्या देशाच्या संसदेत घडला हा प्रकार?
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
japan ban wedding after 25 for women
‘या’ देशात महिलांना पंचविशीनंतर विवाहास मनाई, प्रस्तावावरून नागरिक संतप्त; कारण काय?
swargate police file case against three for gang rape of woman by threatening to kill children
मुलांना जिवे मारण्याची धमकी देऊन महिलेवर सामुहिक बलात्कार; स्वारगेट पोलिसांकडून तिघांविरुद्ध गुन्हा

हेही वाचा : एमपीएससीच्या रखडलेल्या परीक्षांबाबत मोठी अपडेट, तारखा कधी जाहीर होणार? वाचा…

या कारवाईनंतर दोन्ही मुलींच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले. मुलींच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी विवाह न करण्याबाबत सांगण्यात आले. अल्पवयात लग्न लावून दिल्यास व त्यास सहकार्य केल्यास कायदेशीर कारवाई करुन एक लाख रुपये दंड व दोन वर्षे कारावास होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला. मुलीचे वय१८ वर्षे होईपर्यंत लग्न करणार नाही, असे लेखी हमीपत्र पालकांकडून घेण्यात आले. या दोन्ही अल्पवयीन मुली, त्यांचे नियोजित वर आणि लग्न लावून देणारे नातेवाईक अशा सर्वांना बालकल्याण समितीसमक्ष हजर राहण्यास सांगण्यात आले.

जिल्हा महिला बाल विकास अधिकारी प्रभाकर उपरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. बालविवाह रोखणाऱ्या पथकाला मारेगावचे पोलीस निरीक्षक पांचाळ व लाडखेड पोलीस ठाण्याचे हिवरकर यांनी सहकार्य केले. बालविवाह रोखण्याची कार्यवाही मारेगावचे बाल विकास प्रकल्प अधिकारी कळमकर, जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या बाल संरक्षण अधिकारी माधुरी पावडे, चाईल्ड हेल्पलाइन समन्वयक फाल्गुन पालकर, चाईल्ड लाईन सुपरवायझर गणेश आत्राम व दोन्ही गावातील बाल संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पार पाडली.

हेही वाचा : शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर; गुणवत्ता यादी मात्र नाही, कारण काय? जाणून घ्या

आठवडाभरात दुसरी कारवाई

जिल्हा बालसंरक्षण कक्षाने आठ दिवसांपूर्वीच २२ एप्रिल रोजी तब्बल पाच बालविवाह रोखले होते. पांढरकवडा तालुक्यातील पिंपळशेंडा गावात एकाच मांडवात आठ विवाह लावून देण्यात येत होते, त्यातील पाच उपवधू अल्पवयीन असल्याची खातरजमा करून ते पाचही बालविवाह ऐनवेळी थांबविले होते. हे प्रकरण ताजे असतानाच महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी पुन्हा दोन बालविवाह थांबविण्यात आले. त्यामुळे जनजागृतीनंतरही अनेक ठिकाणी बालविवाहांचा प्रयत्न सुरूच असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. बालविवाहाबाबत माहिती असल्यास चाईल्ड हेल्पलाईन १०९८ या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा बालसंरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांनी केले आहे.