यवतमाळ: आभासी जगात रमण्याचा फटका आता सर्वसामान्यांना बसू लागला आहे. सायबर गुन्हेगार अशा युजर्सची मानसिकता हेरून त्यांना जाळ्यात ओढून लुटत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षात ५३ सायबर गुन्ह्याची नोंद झाली आहे. यात एक कोटींपेक्षा अधिक रक्कम अडकली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सायबर क्राईम रोखण्यासाठी जिल्ह्यात स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे स्थापण्यात आले. या पोलीस ठाण्यात दररोज सायबर गुन्ह्याची नोंद वाढत आहे. आतापर्यंत ५३ गुन्हे दाखल करण्यात आले. छत्तीसगड, राज्यस्थान, हरियाणा या प्रमुख राज्यात बसून सायबर गुन्हे केले जात असल्याचे तपासातून पुढे आले आहे.
सायबर फ्रॉडर्स विविध प्रकारचे आमिष दाखवून आपले जाळे फेकतात. त्या लालसेच्या चक्रव्युहात अनेकजण अडकत चालले आहेत. ही लालसा बँक खाते रिकामे झाल्यावरच ताळ्यावर येते. सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी १७ प्रकारची मोड्स ऑपरेंडी वापरली जाते. ऑनलाईन घडणार्या घडामोडींसह व्यवहारात आरोपीचा चेहरा समोर येत नाही. अलीकडच्या काळात सायबर सेल स्मार्ट झाल्याने फसवणूक झाल्यावर तत्काळ तक्रार प्राप्त झाल्यास खात्यातून वळती झालेली रक्कम परत मिळविता येते. मात्र, फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी सावधगिरी बाळगणे हाच एकमेव पर्याय आहे. कास्टिंग फ्रॉडमध्ये चित्रपटात काम देण्याच्या नावाखाली फोटोशूट, ड्रेसेसचा खर्च, करारापोटी रक्कम उकळली जाते. हा व्यवहार ऑनलाइन होतो. केवायसी फ्रॉडमध्ये बँक अकाउंट अपडेट करण्याचे जाळे फेकून बँक डिटेल्स घेऊन गंडा घातला जातो. अमेझॉन फ्रॉडमध्ये बक्षीस लागल्याचे सांगितले जाते. ओएलएक्समध्ये वस्तू विक्री करायची आहे, याच खासकरून आपण सैनिकी अधिकारी असल्याचे चित्र निर्माण केले जाते. गुगल एडिट फ्रॉड यात बँकांचे, पिझ्झा कंपन्यांचे ’कस्टमर केअर नंबर’ एडिट करून त्यावरून केला जातो. वैयक्तिक माहितीसह बँकेचा ओटीपी मागवला जातो.
हेही वाचा… धक्कादायक… प्रसूतीदरम्यान नवजात बाळासोबत ४ किलोचा ट्युमरही आला बाहेर! पुढे काय झाले? वाचा…
स्क्रीन शेअर फ्रॉडमध्ये वृद्घ व महिलांना फसवण्यात येते. इन्शुरन्स फ्रॉडमधूनही गंडा घातला जातो. कस्टम गिफ्ट फ्रॉडमध्ये खासकरून महिलाच मोठ्या प्रमाणात फसतात. ऑनलाइन एखाद्यासोबत मैत्री केली जाते. परदेशातून गिफ्ट पाठविल्याचा बनाव करून केला जातो. कस्टम ड्युटी भरण्याच्या नावाखाली बँक खाते खाली केले जाते. सायबर फ्रॉडर्स नवनवीन स्क्रिप्टनुसार पैसे उकळण्यात माहिर झाले आहे. लोन फ्रॉडमधून ब्लॅकमेलिंगचे प्रकार वाढीस लागले आहे. अलिकडे सेक्सटोर्शनमधून नको तो प्रकार करायला लावून ब्लॅकमेल केले जात आहे. फेक फेसबुक प्रोफाईल बनवून मित्रांकडे पैशाची मागणी केली जाते. मायनर गर्ल्स फ्रॉडच्या जाळ्यात अल्पवयीन मुलीही अडकत चालल्या आहे. सायबर गुन्हेगारांकडून वापरली जाणारी मोड्स ऑपरेंडी धक्कादायक व सुन्न करणारी आहे.
हेही वाचा… सचिन पाठोपाठ आता अनिल कुंबळे सुद्धा ‘भानुसखिंडी’ च्या दर्शनाला…
गेल्या वर्षांत सायबर पोलीस ठाण्यात ५३ गुन्हे नोंद असून, फसवणुकीचा आकडा एक कोटीपेक्षा जास्त आहे. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच तक्रार करण्यात आल्याने आतापर्यंत ३७ लाख ३४ हजार रुपयांची रक्कम होल्ड करण्यात सायबर तज्ज्ञ पोलिसांना यश आले आहे. गेल्यावर्षी पीव्हीसी पाईप बनविण्यासाठी कच्चा माल देण्याच्या बहाण्याने यवतमाळच्या व्यावसायिकाची १२ लाखाने फसवणूक करण्यात आली होती. गेल्या वर्षी मार्च महिन्यात सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने गुजरात राज्यात सूत्रधारास बेड्या ठोकल्या होत्या. त्याने फसवणुकीसाठी बनावट कंपनी रजिस्टर केली होती. तक्रार प्राप्त होताच एकूण रकमेपैकी पाच लाख ५४ हजार रुपये होल्ड करण्यात यश आले होते.
सायबर गुन्हे दिवसेंदिवस वाढत चालले आहे, ही चिंतेची बाब आहे. अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारू नये, अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोनला प्रतिसाद देवू नये, खात्री झाल्याशिवाय कोणतीही लिंक उघडू नये, अशा प्रकारे नागरिकांनी व्हॉट्स अॅप, फेसबुक, इंन्स्टाग्राम हाताळताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे. फसवणूक झाल्यास तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन सायबर तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.