यवतमाळ : दिलेले ‘टास्क’ पूर्ण केल्यास ‘रिवार्ड’ देण्याचा बनाव करून एका तरुणाला दोन लाख ९१ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. सायबर पोलिसांनी तात्काळ दखल घेत तपास केल्याने ऑनलाइन फसवणुकीतील एक लाख ९१ हजार रुपये ‘होल्ड’ करण्यात यश आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अरविंद झाडे (रा. गिलानीनगर), असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या मोबाइलवरील व्हॉट्सअ‍ॅपवर ९ मे रोजी एक मॅसेज आला. तुम्हाला दिलेले एक टास्क पूर्ण केल्यास रिवार्ड देण्यात येईल, असे आमिष दाखविले. झाडे यांनी मोबाईलवर आलेले टास्क पूर्ण केले. यानंतर तक्रारदाराला व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटींग करताना काही पैसे पाठविण्यास सांगण्यात आले. पेटीएमद्वारे दोन लाख ९१ हजार रुपये पाठविले. तरी पैशाची मागणी सुरूच होती. मात्र झाडे यांना कोणत्याही प्रकारे रिवार्ड परत येत नव्हते. त्यामुळे अरविंद झाडे यांनी यवतमाळच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

हेही वाचा – महानगराध्यपदावरून हटवताच निवडणुकीची जबाबदारी, भाजपच्या अकोला पश्चिम विधानसभा निवडणूक प्रमुखपदी विजय अग्रवाल

त्यावरून पथकाने तात्काळ माहिती घेत बँक स्टेटमेंटमधील व्यवहाराचा अभ्यास करू नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदविली. त्यामुळे एक लाख ९१ हजार रुपये होल्ड करण्यात यश आले. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक विकास मुंढे, अजय निबोंळकर, अभिनव बोंद्रे आदींनी केली.

हेही वाचा – चक्क प्रश्नपत्रिकेतच उत्तर! डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ परीक्षा विभागाचा ढिसाळ कारभार

लिंकवर क्लिक नकोच

लॉटरी, जॉब ऑफर, इलेक्ट्रिक बिल, क्रेडीट कार्ड, ऑनलाइन कर्ज आदी प्रकारचे मॅसेज आल्यास त्याला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, सायबर क्राईमचा प्रकार घडल्यास तात्काळ तक्रार करावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yavatmal police succeed in holding online fraud money nrp 78 ssb
Show comments