लोकसत्ता टीम

यवतमाळ: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या आज शुक्रवारी घोषित झालेल्या निकालात मुलींनी उत्तीण होण्याच्या टक्केवारीत आघाडी घेतली आहे. यवतमाळ जिल्ह्याचा निकाल ९१.४९ टक्के लागला. अमरावती विभागात जिल्हा टक्केवारीत तळाला आहे. ९४.९४ टक्के घेत नेर तालुका प्रथम क्रमांकावर, तर ८७.४७ टक्के घेत राळेगाव तालुका जिल्ह्यात शेवटच्या क्रमांकावर आहे.

MPSC announced that it will now conduct screening exams for 33 posts of various types
मोठी बातमी: ‘एमपीएससी’कडून तब्बल ३३ पदांच्या चाळणी परीक्षेसाठी…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
neet pg 2024 percentile reduced to 15 percent
पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे पात्रता निकष शिथिल, पर्सेंटाईल १५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा राष्ट्रीय परीक्षा मंडळाचा निर्णय
Nashik Municipal Schools Face Teacher Shortage,
शिक्षणमंत्र्यांच्या नाशिकमध्ये शिक्षकांची वानवा; मनपा प्राथमिक शिक्षकांची माध्यमिकमध्ये नियुक्तीची वेळ
RTE, RTE Admission, RTE Admission Registration,
‘आरटीई’ प्रवेश नोंदणी १३ जानेवारीपासून, जाणून घ्या सविस्तर…
loksatta readers feedback
लोकमानस: पिढ्या बरबाद करणारे धोरण
nagpur university indicate of increase in examination fees during the senate meeting
विद्यापीठाच्या परीक्षा शुल्कात मोठी वाढ होणार,विद्यार्थ्यांवर भूर्दंडाची ही आहेत कारणे
Mumbai University TYBCom semester 5 result announced
तृतीय वर्ष ‘बी. कॉम.’ पाचव्या सत्र परीक्षेत ४१.७५ टक्के उत्तीर्ण; मुंबई विद्यापीठाकडून १८ दिवसांत निकाल जाहीर

जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी ३६ हजार ५८३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यात १९ हजार १९० मुले व १७ हजार ३९३ मुलींचा समावेश होता. प्रत्यक्षात १८ हजार ८८० मुले व १७ हजार २०९ मुली, अशा एकूण ३६ हजार ८९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी एकूण ३३ हजार २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात १६ हजार ७८४ मुले व १६ हजार २३७ मुलींचा सामवेश आहे. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८८.८९ तर मुलींची टक्केवारी ९४.३५ इतकी आहे. सात हजार ८५९ विद्यार्थ्यांना प्रावीण्य श्रेणी मिळाली. १२ हजार ४८० विद्यार्थी प्रथम श्रेणीत, नऊ हजार ९०४ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, तर दोन हजार ७७८ विद्यार्थी केवळ उत्तीर्ण झाले.

हेही वाचा… भंडारा जिल्ह्याचा निकाल ९३.६६ टक्के

यवतमाळ तालुक्याचा निकाल ९३.८ टक्के, दारव्हा ९१.४३, दिग्रस ९०.४१, आर्णी ९१.९६, पुसद ९३.५, उमरखेड ९०, महागाव ९१.७३, बाभूळगाव ९०.१, कळंब ८९.९, मारेगाव ९२.९७, पांढरकवडा ९०.७९, झरी ८९.६२, वणी ८९.९७ आणि घाटंजी तालुक्याचा निकाल ९१.८६ टक्के लागला.

Story img Loader