यवतमाळ : दारव्हा शहरानजीक आर्णी तहसीलदारांच्या मालकीच्या भरधाव कारने दुचाकीस मागाहून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार दोन तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे दीड वाजताच्या सुमारास दारव्हा शहरानजीक घडली. अंकुश देवराव भजने (२५, रा. रामगाव रामेश्वर) व श्रीकांत प्रमोद ठाकरे (२४, रा. तोरनाळा) ता. दारव्हा अशी मृतांची नावे आहे.

अंकुश व श्रीकांत हे मध्यरात्री बोरी अरब येथून मोटरसायकलने (क्र. एमएच २९, एबी ३७०८) दारव्हाकडे जात होते. दारव्हा शहरानजीक भरधाव कारने (क्र. एमएच २९, बीव्ही ४१३७) दुचाकीस मागाहून जोरदार धडक दिली. या अपघातात अंकुश भजने याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. श्रीकांत ठाकरे यास गंभीर अवस्थेत दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

police registered murder case after body found on mumbai ahmedabad highway
तो अपघात नव्हे तर हत्या; महामार्गावरील अपघाती मृत्यूचे गूढ उकलले
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Crime
Crime News : कर्माचे फळ! अपघातानंतर मृत्युशी झुंजणाऱ्या व्यक्तीला तसंच सोडलं… बाईक घेऊन पळालेल्या तिघांचाही अपघात
two wheeler driver died in Akola on Tuesday after his throat was cut by nylon manja
नायलॉन मांजाचा फास, अकोल्यात गळा चिरून दुचाकी चालकाचा मृत्यू
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी
Navi Mumbai Accident
VIDEO : विरुद्ध दिशेने वाहन चालवणं नवी मुंबईतील दोन तरुणींच्या जीवावर बेतलं; कारच्या धडकेत मृत्यू
Beed Sarpanch Death by accident
Beed Sarpanch Death: सरपंचाच्या मृत्यूमुळं बीड पुन्हा हादरलं; राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनानं चिरडलं, आमदार सुरेश धसांनी व्यक्त केला संशय
chole bhature Two youth found dead in noida room
Death by chhole: ‘छोले’ बनविणं जीवावर बेतलं, गॅसवर पातेलं ठेवून दोन तरुण झोपी गेले; सकाळी झाला मृत्यू

हेही वाचा – वाशीम : तलाव कोरडा; पाण्याअभावी शेकडो माशांचा मृत्यू !

हेही वाचा – देहव्यापारासाठी दिल्लीची मॉडेल विमानातून नागपुरात

अपघाताची माहिती मिळताच दारव्हा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील कार आर्णी येथील तहसीलदार परसराम भोसले यांच्या मालकीची असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय रत्नपारखी करत आहेत.

Story img Loader