यवतमाळ : जिल्ह्यातील काँग्रेस नेते कार्यकर्त्यांना सालदार समजतात. पक्ष नेत्यांकडून कार्यकर्त्यांना नोकरासारखी वागणूक मिळत असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सिकंदर शहा यांनी केला आहे. जिल्ह्यात आधीच कमकुवत झालेल्या काँग्रेसला पक्षाच्या जबाबदार पदाधिकाऱ्याच्या या आरोपामुळे खिंडार पडण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सिकंदर शहा यांनी आज एक प्रसिद्धी पत्रक काढून पक्षातील नेत्यांवर अनेक गंभीर आरोप केले. काँग्रेस नेते आपल्याच कुटुंबातील तरुणांना वाव देत असल्यामुळे काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. एवढेच नव्हे तर काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते अजूनही भाजपच्या वाटेवर असून यासंदर्भात दिल्ली येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना भेटून तक्रार करणार असल्याचे सिकंदर शहा यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: “बाबांनो, रात्री १२ ते ३…”; विनायक मेटे, जयकुमार गोरेंचा उल्लेख करत हिवाळी अधिवेशनात अजित पवारांची सर्व आमदारांना विनंती

काँग्रेस कमिटी तसेच अंतर्गत विविध विंगच्या अध्यक्षपदावर काँग्रेस नेत्यांच्या मुलांचा भरणा करण्यात आला आहे. हा सर्व वशिलेबाजीचा प्रकार आहे. चांगल्या कार्यकर्त्यांना या वशिलेबाजीमुळे काँग्रेसमध्ये सन्मानाचे स्थान राहिले नाही. काँग्रेसचे नेते तसेच त्यांची मुलेसुद्धा त्यांच्याकडे गडगंज संपत्ती असल्यामुळे कार्यकर्त्यांना सालदार समजतात. निव्वळ निवडणूक किंवा इतरही वेळी पैशाच्या जोरावर कार्यकर्त्यांचा वापर करून घेत असल्याचा आरोप शहा यांनी केला आहे. त्यामुळे तळागाळातल्या निष्ठावान कार्यकर्त्यांचे मनोबल ढासळत चालले आहे.

हेही वाचा: महाराष्ट्राच्या ठरावाला खडसेंनी म्हटलं ‘मिळमिळीत’, देवेंद्र फडणवीस संतापले; म्हणाले, “एकतर…”

यवतमाळ जिल्ह्यातील नेत्यांच्या सालदारी प्रवृत्तीमुळे अनेक कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. हा सर्व प्रकार सुरू असताना काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी मात्र याकडे गंभीरतेने बघताना दिसून येत नाहीत, असे शहा म्हणाले. पक्षातील अनेक पदे नेत्यांची मुले किंवा त्यांच्या परिवारातील आणि जवळीक असलेले लोकं आपल्या ताब्यात ठेवत असल्याने आम्ही सतरंजीच उचलायची काय, असा प्रश्नही सिकंदर शहा यांनी कार्यकर्त्यांच्या वतीने उपस्थित केला आहे.