यवतमाळ – जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्यातील राजकीय वैमनस्य ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हमरीतुमरीवर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापासून या दोन्ही नेत्यांत सुरू झालेले शीतयुद्ध आता थेट रस्त्यावर पोहोचले आहे. भावना गवळी समर्थकांनी दारव्हा शहरात संजय राठोड यांना अप्रत्यक्षपणे आव्हान देणारे फलक लावल्याने या दोन्ही नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

दहा वर्षांपूर्वी संजय राठोड पहिल्यांदा राज्यमंत्री झाले तेव्हापासून त्यांच्यात आणि खासदार भावना गवळी यांच्यात वर्चस्वाचा वाद सुरू झाला. संजय राठोड यवतमाळसह वाशिमचेही पालकमंत्री झाले. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांत राठोड यांनी प्रशासनावर आपली पकड निर्माण केली. त्यावेळी दोन्ही नेते शिवसेनेत होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड आणि भावना गवळी यांना ‘मातोश्री’वर बोलावून समज दिली होती. शिवसेना फुटल्यावर संजय राठोड आणि भावना गवळी शिंदे गटात गेले. आता या दोघांमधील वाद मिटून जिल्ह्यात शिवसेनेला अच्छे दिन येतील असे वाटत असताना या दोन्ही नेत्यांमधील राजकीय कलह सुरूच राहिला. दोन्ही नेत्यांच्या फलकांवर एकमेकांचे छायाचित्र वापरण्यात येत नाही. संजय राठोड यांच्या कोणत्याही कार्यक्रमाच्या फलकावर, जाहिरातीत भावना गवळी यांचे छायाचित्र नसते. त्याचप्रमाणे भावना गवळीसुद्धा संजय राठोड यांचे छायाचित्र आपल्या कोणत्याही कार्यक्रमाच्या फलकांवर वापरत नाही. दोघेही एकमेकांच्या कोणत्याही कार्यक्रमात येत नाहीत.

Deputy Chief Minister Eknath Shinde on a tour of Dare village
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे दौऱ्यावर
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Will Deputy Chief Minister Eknath Shinde succeed in retaining post of Guardian Minister of Thane
अजित पवारांचा कित्ता एकनाथ शिंदे गिरवणार का?
Eknath Shinde
नाराज आमदारांना एकनाथ शिंदेंकडून श्रद्धा अन् सबुरीचा सल्ला; म्हणाले, “दुसऱ्या टप्प्यात…”
Deputy Chief Minister Eknath Shinde visited Smriti Mandir premises and talk about RSS
एकनाथ शिंदे म्हणाले, “संघाकडून निस्वार्थ भावनेने काम कसे करावे…”
Deepak Kesarkar On Uddhav Thackeray shivsena
Deepak Kesarkar : “…तर शिवसेनेचे दोन भाग झालेच नसते”, ठाकरे-फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Shambhuraj Desai, Bharat Gogawale
शिंदे यांची तारेवरची कसरत; भाजपचा आक्षेप असलेल्या तीन मंत्र्यांना वगळले
Eknath Shindes struggle while selecting Shiv Sena ministers in cabinet
Eknath Shinde : शिंदे यांची तारेवरची कसरत

हेही वाचा – पुण्यात भाजपचे मोहोळ की देवधर ?

गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यवतमाळात सभा होती. या सभेसाठी ‘महायुती’कडून जाहिराती देण्यात आल्या. या जाहिरातीत संजय राठोड यांच्यासह भाजप, राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) आमदारांचे छायाचित्र होते. या जाहिरातीतून खासदार भावना गवळींना वगळण्यात आल्याने महायुतीत वर्चस्वाची लढाई सुरू असल्याची चर्चा आहे. हा वचपा भावना गवळींना सोमवारी वाशिम येथे आयोजित मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमात काढल्याची चर्चा आहे. या कार्यक्रमासाठी भावना गवळी यांनी वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड यांना कोणतेही महत्व दिले नाही. त्यांचे छायाचित्र, नावही कुठे वापरले नाही. त्यामुळे संजय राठोड या कार्यक्रमास आले नाही.

या कार्यक्रमाच्या दुसऱ्याच दिवशी संजय राठोड यांचा बालेकिल्ला असलेल्या दारव्हा शहरात भावना गवळींच्या समर्थनार्थ फलक लागले. यात ‘मत पुछ मेरे नाम की पहचान कहाँ तक है, तू बदनाम कर तेरी औकात जहाँ तक है…’, असे लिहून अप्रत्यक्षपणे संजय राठोड यांची ‘औकात’ काढून आव्हान दिल्याची चर्चा मतदारसंघात रंगली आहे. संजय राठोड समर्थकांकडून यावेळी भावना गवळी यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव होईल, असे सांगितले जात आहे. त्याला उत्तर देताना, ‘आम्हाला पराभवाची भीती नाही, कारण आमचा जन्मच संघर्षाच्या मातीत झालाय’, असे म्हटले आहे. हे फलक चर्चेचा विषय ठरले असताना नगर परिषद प्रशासनाने ते तत्काळ हटविले.

हेही वाचा – दिल्लीचा अर्थसंकल्प रामराज्य आणि रामायणाने प्रेरित; लोकसभा निवडणुकीत होणार फायदा?

या फलकबाजीवरून शिवेसेना शिंदे गटातील दोन्ही वरिष्ठ नेत्यांमधील धुसफूस बाहेर आली. यवतमाळ-वाशिमची जागा शिवसेना शिंदे गटाची आहे. येथे भावना गवळींनीच उमेदवारी मागितली आहे. परंतु, भाजप अनुकूल नाही. त्यामुळे येथून संजय राठोड यांना लढवावे, असा एक मतप्रवाह आहे. संजय राठोड लोकसभेत जाण्यास इच्छुक नाहीत. मात्र मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपने दबाव आणल्यास त्यांचा नाईलाज होणार आहे. अशा वेळी दिग्रस विधानसभा मतदारसंघात संजय राठोड आपल्या मुलीसाठी उमेदवारी मागू शकतात. हा धोका ओळखून भावना गवळी यांनी आक्रमक पवित्रा घेत संजय राठोड यांना थेट आव्हान दिल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. संजय राठोड आणि भावना गवळी यांच्या वादात जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे मात्र राजकीय नुकसान होण्याची चिन्हे आहेत. शिंदे गटातील ही दुफळी भविष्यात मित्रपक्ष भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे.

Story img Loader