वाशीम : महायुतीने आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली असून उमदेवाराची चाचपणीही संपल्यात जमा आहे. सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत असताना अचानक शिवसेना शिंदे गटाच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना सहकार खात्याची नोटीस आल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघात भाजपकडून धक्कातंत्राचा अवलंब केला जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात असून आगामी लोकसभेत महायुतीचा उमेदवार म्हणून जिल्ह्यातील एका बड्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.
लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्या पार्श्वभुमीवर भाजपची जय्यत तयारी सुरु आहे.२०२४ मध्ये स्वबळावर सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने राज्यात मिशन १४४ हाती घेतले आहे. यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघात देखील भाजपने आधीपासूनच व्यूहरचना आखत लोकसभा समन्वयकांची नियुक्ती केलेली आहे. मतदार संघात पक्ष संघटन मजबूत करण्यासह शासकीय योजना जनतेपर्यत पोहचविण्यासोबतच सर्वच घटकावर बारीक लक्ष ठेऊन आहे. त्यातच काही महिन्यापुर्वी आगामी लोकसभेच्या अनुषंगाने भाजपच्या विश्वासु संस्थेकडून लोकसभा मतदार संघाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या सर्वेक्षणात शिंदे गटाच्या खासदारांना आगामी निवडणुक अडचणीची असल्याच्या नि्ष्कर्ष काढण्यात आला होता. त्या अहवालानंतर भाजपची यंत्रणा सतर्क झाली आहे.
हेही वाचा : अकोला जिल्हा नियोजन योजनेच्या निधीतून केवळ ३४.२९ टक्के खर्च, लोकप्रतिनिधींची नाराजी; पालकमंत्री म्हणाले…
निवडणुका जस जशा जवळ येत आहेत. तसे तसे चित्र बदलत असल्याचे दिसून येत आहे. सद्या यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघाच्या खासदार भावना गवळी ह्या शिंदे गटाच्या खासदार आहेत. केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे. मात्र तरीही त्यांच्याच संस्थेतील एका प्रकरणात सहकार खात्याकडून त्यांना आलेली नोटीस जिल्हयात चर्चेचा विषय ठरली आहे. याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा महंत सुनिल महाराज यांनी भावना गवळींविरोधात मतदार संघात नाराजी असल्याचा आरोप करुन भाजपकडून देखील भावना गवळी यांना पाठींबा नसल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. आगामी निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या संभाव्य उमेदवार म्हणून खासदार भावना गवळी ह्याच राहतील असा कयास असतांना मात्र, महायुतीकडून संभाव्य उमेदवार म्हणून वाशीम जिल्हयातील एका बडया नेत्यांच्या नावची चर्चा जोर धरत आहे. या नेत्याला वरीष्ठांकडून थेट प्रचाराला लागण्याच्या सुचनाही प्राप्त झाल्या आल्याची विश्वसनीय माहिती आहे. मात्र, गेल्या पाच टर्मपासून यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघात लाखाच्या मताने निवडून येत असलेल्या विद्यमान खासदार भावना गवळींना डावलून भाजप नव्या चेहऱ्याला संधी देणार का ? तो नवीन चेहरा कोण ? हे अद्याप जरी गुलदस्त्यात असले तरी लवकरच चित्र स्पष्ट होईल.