नागपूर : यवतमाळ – वाशीम लोकसभा क्षेत्रासाठी झालेल्या मतदानाच्या आकडेवारीतील तफावतीविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी शुक्रवारी अवकाशकालीन खंडपीठापुढे सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने याबाबत यवतमाळ आणि वाशीम जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस दिली आहे. २६ जूनपर्यंत दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांसह निवडणूक आयोगाला उच्च न्यायालयात उत्तर सादर करायचे आहे.

या मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान पार पडले. यात १२ लाख २० हजार १८९ मतदारांनी मतहक्क बजावला. ही टक्केवारी ६२.८७ इतकी आहे. याबाबत याचिकाकर्ता आणि यवतमाळ-वाशीम लोकसभा क्षेत्रातील उमेदवार डॉ.अनिल राठोड यांनी सम्यक जनता पक्षाच्यावतीने बूथनिहाय मतदान यादी मागवली होती. या माहितीनुसार मिळालेली आकडेवारी आणि जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये २५ मते जास्त असल्याचे आढळून आले. यामध्ये राळेगाव विधानसभा मतदारसंघात २० मते तर वाशीम विधानसभा मतदारसंघात पाच मते अधिक आढळली. या गंभीर प्रकाराची डॉ. अनिल राठोड यांनी २९ मे रोजी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली व सोबतच जोपर्यंत मतांची आकडेवारी निश्चित होत नाही तोपर्यंत मतमोजणी प्रक्रिया थांबवावी तसेच फार्म १७ सी नुसार बूथनिहाय आकडेवारी जाहीर करावी,या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवरील सुनावणी ३१ मे रोजी पार पडली. यावेळी याचिकाकर्त्याच्यावतीने ॲड. डॉ. मोहन एस. गवई यांनी बाजू मांडली. अखेर न्यायालयाने मतदानाच्या आकडेवारीतील फरकाबाबत केंद्रीय निवडणूक आयोग दिल्ली, यवतमाळ जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी आणि वाशीम जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी यांना उत्तर नोंदविण्याचे आदेश दिले.

Maharashtra assembly elections
विश्लेषण: उमेदवारांच्या गर्दीमुळे छोट्या पक्षांची मते निर्णायक; समीकरणे कशी आहेत?
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Kothrud Vidhan Sabha Constituency BJP Chandrakant Patil will be in trouble Amol Balwadkar Rebellion Shisvena UBT Chandrakant Mokate MNS Kishor Shinde
कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटलांच्या अडचणीत वाढ
code of conduct for maharashtra assembly poll questions arise for honoring maha puja of kartiki ekadashi
कार्तिकी एकादशीच्या महापूजेचा मान यंदा कोणाला?
candidates in Kolhapur file nomination for assembly poll
कोल्हापुरात कोरे, महाडिक, घाटगे, यड्रावकर, आवाडे यांचे शक्तिप्रदर्शन; ऋतुराज, सत्यजित, राहुल पाटील यांचा साधेपणाने अर्ज
abhijeet bichukale will contest assembly election from satara (1)
‘बिग बॉस मराठी’ फेम अभिजीत बिचुकले शिवेंद्रराजेंविरोधात लढवणार निवडणूक; म्हणाले, “हे दोन्ही राजे फक्त…”
kin of influence leaders in all parties contest assembly election in maharastra
Maharashtra Election 2024 : कुटुंबविळखा! सर्वच पक्षांत सग्यासोयऱ्यांना ‘घाऊक’ उमेदवारी
article 324 to 329 of part 15 of constitution contains provisions regarding elections
संविधानभान : निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य धोक्यात?

हेही वाचा : उमरेडमधील मटकाझरी तलावात बुडून तिघांचा मृत्यू , झाले असे की…

मतगणनेवर स्थगितीची मागणी फेटाळली

याचिकाकर्ता आणि यवतमाळ-वाशीम लोकसभा क्षेत्रातील उमेदवार डॉ.अनिल राठोड यांनी मंगळवार ४ जून रोजी होणाऱ्या मतगणनेवर स्थगिती आणण्याची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने ही मागणी अमान्य केली. त्यामुळे यवतमाळ-वाशीम लोकसभा क्षेत्रातील मतगणनेवर कुठलाही परिणाम होणार नसून ४ जून रोजीच मतगणना होणार असल्याचे निश्चित झाले आहे.