लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
बुलढाणा : पावसाच्या लहरीपणामुळे चिंताक्रांत झालेल्या सव्वालाख बुलढाणा शहर व परिसरवासियांचे मोठे ‘टेन्शन’ काही प्रमाणात दूर झाले आहे. येळगाव धरणात ७० टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. दुथडी भरून वाहणाऱ्या पैनगंगा मुळे संध्याकाळपर्यंत हा आकडा ७५ टक्केच्या घरात जाणार आहे. आता मे मध्यापर्यंत पुरेल इतका जलसाठा असल्याने पाणी टंचाईचे संभाव्य संकट टळले.
बुलढाणा चिखली राज्यमार्गावर असलेल्या येळगाव धरणावरून बुलढाणा शहरासह पंचक्रोशीतील गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. धरणातील साठा २२ टक्केपर्यंत गेल्याने सव्वा लाख नागरिकांसह प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. मात्र काल गुरुवारी रात्री पैनगंगा नदीच्या ‘कॅचमेंट’ क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने नदीला पूर आला. आज सकाळी दहा वाजताही पूर कायम असल्याचे सुखद चित्र दिसून आले.
आणखी वाचा-सावधान! शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष अन…
दरम्यान येळगाव मध्ये आज रोजी ८.९० दश लक्ष घन मीटर( ७० टक्के) इतका जलसाठा उपलब्ध झाला आहे. नदी दुथडी भरून वाहत असल्याने आज शुक्रवारी संध्याकाळ पर्यंत जलसाठा ७५ टक्केच्या घरात जाणार आहे. नगरपरिषद सूत्रांनी ही माहिती दिली.