बुलढाणा : देशातील करोडो योगप्रेमी भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय प्राचीन योग कलेला आशियाई खेळांमध्ये सहभागी करून घेण्यास आशियाई ऑलिम्पिक परिषदेने संमती दर्शविली आहे. यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत योगा संदर्भातील प्रात्यक्षिक खेळ दिसणार आहे.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार तथा केंद्रीय आयुष आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या बुलढाणा स्थित जनसंपर्क कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष श्रीमती पी. टी. उषा यांनी नुकतीच केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान प्रतापराव जाधव यांनी आशियाई खेळामध्ये योगाचा समावेश झाला पाहिजे, अशी मनस्वी इच्छा व्यक्त केली. या संदर्भातील प्रस्ताव आशियाई ऑलिंपिक परिषदेच्या कार्यकारी मंडळ (बोर्ड) कडे पाठविण्यात आला आहे. या मंडळाने आशियाई खेळामध्ये योगाचा सहभाग करण्यासंदर्भात सहमती दिली आहे. आता अशियाई ऑलिम्पिक परिषदेची आमसभा सप्टेंबर महिन्यात सभा होणार आहे. या सभेमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर अशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये औपचारिक रित्या योगाला स्थान मिळणार आहे.

Himanta Biswa Sarma
“झारखंडमध्ये मुस्लिमांची संख्या वाढत आहे, कारण…”; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा?
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Diwali festival, celebration, relationship, family
दिवाळी: अर्थात नात्यांचा उत्सव
Atul Vandile nominated from Hinganghat and Three candidates from Teli community in Wardha
हिंगणघाटमधून आघाडीचे अतुल वांदिले, तैलिक संघटनेच्या प्रभावाने वर्धा जिल्ह्यात तीन उमेदवार
रावसाहेब दानवे यांचे पुत्र भाजप तर मुलगी शिवसेनेकडून लढणार
Jijau organization, Mahayuti, Thane district,
ठाणे जिल्ह्यात जिजाऊ संघटनेची साथ महायुतीला ?
जागावाटपाचा घोळ मिटेना! महायुती, महाविकास आघाडीत नुसत्याच चर्चेच्या फेऱ्या; अंतिम निर्णयाकडे लक्ष
Sharad pawar demand supreme court to freeze clock,
‘घड्याळ’ चिन्हाबाबत उद्या सुनावणी; शरद पवार गटाची बाजू ऐकण्याची तयारी

हेही वाचा…वॉर्ड समितीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांचे ‘लाडकी बहीण’वर नियंत्रण

भारतीय प्राचीन योग कलेला आशियाई स्पर्धेमध्ये समावेश होणे हा भारतीयांचा गौरव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय स्तरावर योगाला मानाचे स्थान मिळाल्यानंतर येणाऱ्या ऑलिम्पिक खेळ प्रकारामध्येही योगाचा समावेश होत असल्या बद्दल जाधव यांनी समाधान व्यक्त केला आहे.

हजारो वर्षांपासून भारतामध्ये योग अभ्यास केला जात आहे. योगामुळे मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. या योगाचा अभ्यास भारतासह पाश्चिमात्य देशांमध्येही मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे. त्यापासून होणारे फायदे ही त्यांना दिसू लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सर्वत्र साजरा जावा असे मत मांडलं होतं. त्याला संयुक्त राष्ट्रसंघाने पाठिंबा दिला २०१४ पासून २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जात आहे.

हेही वाचा…नागपूर : उपचाराला पैसे नसल्याने पती-पत्नीने विष घेतले, मुलीलाही दिले अन्…

हा तर योगाचा बहुमान

दरम्यान या संदर्भात प्रतिक्रिया विचारली असता , ही घडामोड आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत योगा चा संभाव्य समावेश ही आनंदाची बाब आहे. जिल्ह्यासह देशातील करोडो योग प्रेमी, साधक, प्रशिक्षक, संस्था साठी ही स्वागतार्ह बाब ठरावी. योगाचा आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभाग निश्चितच स्वागतार्ह ठरावा, असे जाधव म्हणाले.

हेही वाचा…राज्यात अकोल्यासह सात जिल्ह्यांत एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय, ९२ नवीन पदांची…

कार्यकारी अध्यक्षाशी चर्चा

भारतीय योग साधनेला आंतरराष्ट्रीयस्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन्मान मिळून दिला. योग विषयी पंतप्रधान मोदी यांची असलेली आस्था लक्षात घेताच योगाला आशियाई स्पर्धेमध्ये ही स्थान मिळावं दृष्टीकोनातून केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी आशियाई ऑलम्पिक परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष रणधीरसिंग यांच्या सोबतही चर्चा केली. त्यांनी योगा समावेशाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून सर्वोतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही जाधव यांना दिली.