नागपूर : मोदी सरकार सर्वच यंत्रणांचा ताबा घेत असून लोकशाहीचा गळा आवळत आहे. राज्यघटनेचा पाया कमकुवत करीत आहे. या हुकूमशाही सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी ‘जितेगा इंडिया बनेगा भारत’ अभियानाअंतर्गत सव्वालाख स्वयंसेवक देशातील १५० लोकसभा मतदारसंघात कार्य करतील, अशी माहिती स्वराज्य इंडियाचे संस्थापक योगेंद्र यादव यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा – नागपूर : मंत्री म्हणाले ३ तारखेला, प्रशासन म्हणते ५ ला, पूरग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा

हेही वाचा – खगोलप्रेमींसाठी आजपासून पर्वणी! सलग पाच दिवस दिसणार आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक; जाणून घ्या वेळ आणि दिशा…

गेल्या फेब्रुवारीमध्ये भारत जोडो उपक्रमाची स्थापना करण्यात आली. हे देशातील १५ राज्यात आहे. २ ऑक्टोबरपासून भारत जोडोअंतर्गत ‘जितेगा इंडिया बनेगा भारत’ अभियानाला सुरुवात झाली आहे. या अभियानाअंतर्गत सव्वालाख स्वयंसेवक तयार केले जातील. हे स्वयंसेवक जेथे भाजप पराभूत होऊ शकते किंवा मोजक्या मतांनी विजयी होऊ शकते, अशा १५० लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीचा प्रचार करतील. त्यापूर्वी हे स्वयंसेवक त्या मतदारसंघातील मतदार यादीवर लक्ष ठेवतील. हे स्वयंसेवक सहा महिने संबंधित मतदारसंघात राहतील, असेही ते म्हणाले.