भंडारा : शासकीय आयटीआय तुमसर येथील यांत्रिक इलेक्ट्रॉनिक्स या पदावर कार्यरत असलेले शिल्पनिदेशक योगेश नगरकर यांनी महाविद्यालय प्रशासनाच्या छळाला कंटाळून शिक्षकदिनीच आत्महत्या केली. या घटनेने शिक्षण विश्वात खळबळ उडाली आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या प्राचार्य आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

गोकुळपेठ येथील योगेश दिनेश नगरकर (४५) हे भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात (आयटीआय) शिल्पनिदेशक होते. जूनच्या पहिल्या आठवड्यातच त्यांची बर्डी येथील आयटीआयमधून तुमसर येथे बदली झाली. योगेश यांची बदली झाल्यापासून त्यांचा पगार झाला नसल्याचे योगेश यांचे भाऊ नीलेश यांनी सांगितले. पगारासाठी त्यांनी आयटीआयच्या प्राचार्या नीता पिसे व विभागाचे सहसंचालक पुरुषोत्तम देवतळे यांच्याशी अनेकदा पत्रव्यवहार केला. त्यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती देऊन लवकरात लवकर पगार देण्याची मागणी केली होती. सोमवारी रात्री ११ वाजता घरी परतल्यानंतर ते जेवण करून झोपले आणि मंगळवारी सकाळी जाग आली तेव्हा पत्नी रेखाकडे चहा मागवला. पत्नी रेखा चहा घेण्यासाठी खाली आल्यानंतर त्यानी स्टोअर रूममध्ये जाऊन गळफास लावून घेतला. आरोप-प्रत्यारोपांमुळे काही काळ तणाव कायम होता. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
buldhana students hospitalized loksatta
बुलढाणा : शेगाव गतिमंद विद्यालयातील १४ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; एकाचा मृत्यू
Noida suicide case
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विद्यार्थ्याच्या एक्स-गर्लफ्रेंडला अटक; जुळवून घेण्यास दिलेला नकार
Suicide student Nagpur, Suicide of 12th student,
अभ्यासाच्या तणावातून बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”
Representative Image
“मी अभ्यास करू शकत नाही, हे माझ्या आवाक्याबाहेर…” कोटामध्ये IIT प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
Delisa Perera
वसईतील डॉक्टर डेलिसा परेरा यांची आत्महत्या; आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक

हेही वाचा – मुंबईच्या नागपाडातून बालिकेचे अपहरण, कोलकाताकडे घेऊन जाणाऱ्या आरोपीला शेगावात अटक

हेही वाचा – ‘इंडिया’ऐवजी भारत होणार? जगातील या देशांनी आपले नाव का बदलले, जाणून घ्या

विभागीय चौकशी समिती नेमण्यात यावी

योगेश नगरकर आत्महत्या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी विभागीय चौकशी समिती नेमण्यात यावी तसेच संबंधित सहसंचालक व प्राचार्य यांना कायमस्वरूपी सेवेतून निलंबित करण्यात यावे, जेणेकरून असा वाईट प्रसंग कोणत्याही कर्मचाऱ्यांवर येऊ नये, अशी मागणी पीडित कुटुंबासह शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम यांनी मुंबई येथील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांच्याकडे केली आहे.

Story img Loader