अमरावती : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘एक है तो नेक है’ आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणांवर टीका केली. त्यावर योगी आदित्यनाथ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मल्लिकार्जून खरगे यांच्या गावावर हैद्राबादच्या निझामाच्या रझाकारांनी हल्ला करून हिंदूंची कत्तल केली होती, त्यात त्यांच्या आई, बहीण आणि अनेक नातेवाईकांना प्राण गमवावे लागले होते. खरगे मात्र मुस्लीम नाराज होतील, म्हणून रझाकारांचे नाव घेत नाहीत. खरगे हे रझाकारांच्या अत्याचाराविषयी का बोलत नाहीत, असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी केला.
भाजपचे अचलपूरचे उमेदवार प्रवीण तायडे यांच्या प्रचारार्थ परतवाडा येथे आयोजित सभेत ते बोलत होते. सभेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा आदी उपस्थित होते.
योगी आदित्यनाथ म्हणाले, काँग्रेसच्या तत्कालिन नेतृत्वाने मुस्लीम लीगला प्रोत्साहन देऊन देशात विभाजन घडवून आणले. हैद्राबादच्या निझामाने त्यावेळी हिंदूंची कत्तल केली. यात मल्लिकार्जून खरगे यांच्या कुटुंबातील सदस्य मारले गेले. खरगे हे या घटनेची माहिती देताना निझाम आणि रझाकारांचे नाव मात्र जाणीवपूर्वक टाळतात, कारण त्यामुळे मुस्लिमांची मते दुरावण्याची भीती त्यांना वाटते. हिंदू हे विभागलेले होते, त्यामुळे हिंदूंची कत्तल झाली. हिंदू एक असते, तर हे शक्य झाले नसते. त्यामुळे मी ‘बटेंगे तो कटेंगे’ हे सातत्याने सांगत आलो आहे.
हेही वाचा – नागपुरात डासांचा उद्रेक…अन् काँग्रेस उमेदवार प्रचार सोडून फाॅगिंग…
उत्तरप्रदेशात यमराज बसले आहेत
जेव्हा हिंदू विखुरलेला असतो, तेव्हा गणेश विसर्जन मिरवणुकांवर दगडफेक होते. ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लॅन्ड जिहाद’ घडवून आणला जातो. हे गुंड लोक तुमच्या जमिनीचा ताबा घेतात. बहिणी सुरक्षित नसतात. पण, आता उत्तर प्रदेशमध्ये असे होत नाही. त्या ठिकाणच्या माफियाला आम्ही वठणीवर आणले आहे. कुणी जर अवैधरीत्या कुणाच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न केला किंवा बहिणींकडे वाईट नजरेने पाहिले, तर त्यांच्यासाठी यमराज तिथे बसले आहेत.
अनेकांचे ‘राम नाम सत्य’ झाले आहे. उत्तर प्रदेशात आधीच्या सरकारांनी या माफियांना संरक्षण दिले होते. त्यांच्या तावडीतून उत्तर प्रदेश मुक्त करण्यात आला आहे, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. महाविकास आघाडी ही मुस्लिमांचे तुष्टीकरण करणारी विकास विरोधी आघाडी आहे, असा आरोप त्यांनी केला.