नागपूर : मोठ्या भावाचे लग्न झाल्यानंतर काही महिन्यांतच दीर आणि वहिनीचे सूत जुळले.तीसुद्धा पतीपेक्षा दिरालाच जवळ करायला लागली. पत्नीशी जवळीक साधताना लहान भावाला बघताच घरात वादाचा भडका उडाला. या वादातून लहान भावाने मित्राच्या मदतीने मोठ्या भावाचा कुऱ्हाडीने वार करुन खून केला. वहिणीच्या प्रेमात वेड्या झालेल्या दिराकडून भावाचाच खून झाल्याची थरारक घटना काटोलजवळील एका गावात उघडकीस आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सत्येंद्र आणि संदीप असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.

सत्येंद्र आणि जीतेश हे दोघे भाऊ. काटोल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात सधन शेतकरी. दोघांनीही शेती कसून पैसा गोळा केला. शेतीच्या कामात दोघेही भावंडांनी लग्न केले नव्हते. शेवटी एका नातेवाईकांच्या मदतीने ३५ वर्षीय मोठा भाऊ याचे तीन वर्षांपूर्वी एका नातेवाईक तरुणीशी लग्न झाले.

हेही वाचा…‘स्वाईन फ्लू’ प्रतिबंधात्मक लसीबाबत डॉक्टरांमध्येही भीती…आरोग्य विभाग…

ती तरुणी नातेवाईक असल्यामुळे दोघेही भाऊ तिला लग्नाच्या पूर्वीपासून ओळखत होते. जीतेशचे मोठ्या थाटात लग्न झाले. सर्व काही सुरळीत सुरु होते. मोठ्या भावाने स्वत:चा संसार थाटला. घरातील वातावरण आनंदात होते. मात्र, काही महिन्यानंतर सत्येंद्रचे वहिणी स्विटी (काल्पनिक नाव) हिच्याशी सूत जुळले.

दोघेही समवयस्क असल्यामुळे दोघांचे घरातही चांगले पटत होते. त्यामुळे घरात कुणालाही त्यांच्या संबंधाबाबत संशय नव्हता. परंतु, काही महिन्यांतर वहिणी आणि दिरामध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. नेहमी शेतात कामावर जाणारा सत्येंद्र शेतात जात नव्हता. अनेकदा तो घरात एकटाच राहत होता. त्यामुळे मोठ्या भावाला दोघांच्या अनैतिक संबंधाबाबत थोडी जाणीव झाली.

हेही वाचा…पोलीस उपनिरीक्षक नियुक्ती प्रलंबित; सरकारची उदासीनता, न्यायालयाच्या स्थगितीचा फटका

बायको आणि भाऊ दिसले एकाच खोलीत

मोठा भाऊ शेतात गेल्यानंतर वहिणी आणि दिर दोघेही एकाच खोलीत बसलेले होते. त्यादरम्यान, शेतात गेलेला भाऊ तासाभरात परत आला. तो घरात गेला असता दोघांनाही त्याने एकाच खोलीत बघितले. त्याने बायकोला जाब विचारला असता डोळ्यातील कचरा दिर काढून देत असल्याचे तिने सांगितले. मात्र, बायकोच्या चारित्र्यावर त्याला संशय आला. त्याने दुसऱ्या दिवशी घर सोडले आणि दुसरीकडे राहायला गेला. पती-पत्नीत पुन्हा चांगले संबंध निर्माण झाले. त्यांना बाळ झाले. सुखी संसार पुन्हा सुरु होता.

घरी परत आला अन घात झाला

दोन वर्षे बाहेरगावी राहणारा जीतेश हा पत्नी व बाळासह पुन्हा गावी परतला. शेती करायला लागला. यादरम्यान वहिणी आणि दिराचे पुन्हा प्रेम फुलले. मोठ्या भावाने पत्नी व भावाला दोघांनाही मारहाण केली. त्यामुळे चिडलेल्या भावाने मित्र संदीप याच्या मदतीने संपविण्याचा कट रचला. भाऊ रात्रीला शेतात गेल्यानंतर त्याच्या पाठीमागे दोघेही गेेले. त्यांनी जीतेशचा कुऱ्हाडीने वार करुन खून केला. काटोल पोलिसांनी मात्र २४ तासांच हत्याकांड उघडकीस आणले. दोन्ही आरोपीस अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yong brother killed his elder brother dueto his affair with sister in law adk 83 sud 02