लोकसत्ता टीम

नागपूर: चंद्रपूरची निवडणूक सोपी नाही, संघर्ष केल्याशिवाय माणूस मोठा होत नाही, असे मत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. त्या नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होत्या.

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
State Government approved one time transfer for Community Health Officers under National Health Mission
आता समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्याही बदल्या होणार
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

महाविकास आघाडीत चंद्रपूरच्या जागेचा तिढा सुटत नव्हता. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर व विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवर यांची कन्या शिवानी यांनी या मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती. प्रतिभा धानोरकर यांचा दावा प्रबळ होता, पण वडेट्टीवार यांनीही संपूर्ण शक्ती मुलीच्या उमेदवारीसाठी पणाला लावली होती अखेर रविवारी काँग्रेसने याबाबत अंतिम निर्णय घेतला व प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली. आज त्या नागपूरला आल्या. विमानतळावर त्यांचे मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी जोदार स्वागत केले.

आणखी वाचा-रश्मी बर्वे प्रकरणी शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग! यंत्रणांनी दाखवलेली तत्परता थक्क करणारी

माध्यमांशी बोलताना प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, माझ्या उमेदवारीसाठी सर्व गटांनी, घटक पक्षांच्या नेत्यांनी प्रयत्न केले. पती दिवंगत बाळू धानोरकर यांच्या प्रमाणेच मलाही उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागला. चंद्रपूरची निवडणूक सोपी नाही, मात्र संघर्ष केल्याशिवाय मोठेहोता येत नाही. त्यामुळे यापुढेही मी संघर्ष करीतच राहणार आहे. विजय वडेट्टीवार यांच्या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नांना त्यांनी संयमीपणे उत्तर दिले. त्यांना उमेदवारी मिळाली असती तर मी प्रचाराला गेले असते, मला उमेदवारी मिळाली तर ते प्रचाराला येतील. शेवटी ही निवडणूक हुकूमशाही विरुद्द लोकशाही अशी आहे, उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी मी वडेट्टीवार यांना बोलवणार आहे, असे धानोरकर म्हणाल्या.

Story img Loader