मोबाईल अॅपवरून ऑनलाईन मैत्री करणाऱ्या दोघांनी नागपूरमधील एका युवकावर सामूहिक लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी युवकाच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आहे. आवेश मिर्झा (२३, दिघोरी) आणि अनिल उईके (२०, बाहदुरा फाटा) अशी आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा >> “पंतप्रधान मोदी स्वत:ला गांधीवादी म्हणत असले, तरी ते मूळ सावरकर…”; शरद पोंक्षेंचं मोठं विधान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १९ वर्षीय युवकाने मोबाईलवर असलेल्या एका अॅपमध्ये नोंदणी केली होती. त्या अॅपमध्ये मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त केले जाते. त्यानुसार पीडित तरुणाची आवेश आणि अनिल उईकेशी मैत्री झाली. शुक्रवारी दुपारी दीड वाजता रमना मारोती परीसरात तिघांनीही भेटण्याची वेळ ठरविली. तिघेही रमना मारोती परीसरात भेटले.

हेही वाचा >> फडणवीसांना काय सल्ला देणार विचारलं असता पंकजा मुंडेंनी दिलं उत्तर; म्हणाल्या “काही वाटत असेल तर…”

मात्र आरोपी आवेश आणि उईके या दोघांनी पीडित तरुणाला निर्जन स्थळी नेत त्याच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केला. सायंकाळी युवक घरी पोहचला असता त्याने हा प्रकार आपल्या आईवडिलांना सांगितला. त्यानंतर पालकांनी त्याला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दाखल तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपी सध्या फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Story img Loader