गडचिरोली : चंद्रपूर येथील महाकालीचे दर्शन घेऊन दुचाकीने परत गावाकडे निघालेल्या पती – पत्नीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अभियंता असलेल्या पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी झाली. १९ ऑक्टोबरला रात्री आष्टी-चंद्रपूर मार्गावर हा अपघात घडला. प्रमोद देवराव जयपूरकर (२७,रा.आष्टी ता.चामोर्शी) असे मृताचे नाव असून पत्नी प्रणाली प्रमोद जयपूरकर (२३) जखमी आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रमोद हे गडचिरोलीत प्रधानमंत्री ग्रामसडक योजना विभागात स्थापत्य अभियंता  होते. पत्नी प्रणालीसमवेत ते  चंद्रपूर येथे महाकाली देवीच्या दर्शनाला दुचाकीने (एमएच ३३ यू- ३६०८) गेले होते. दर्शन घेतल्यावर परतताना उशीर झाला. रात्री साडेनऊ वाजता चंद्रपूरच्या सावलीजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यानंतर वाहन सुसाट निघून गेले. यात प्रमोद जयपूरकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्तस्त्राव होऊन जागीच ठार झाले.

हेही वाचा >>> येशू ख्रिस्ताचा फोटो लावला म्हणजे धर्मांतरण…, उच्च न्यायालय काय म्हणतंय जाणून घ्या

पत्नी प्रणाली यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरु आहेत. प्रमोद यांचा तेलंगणातील प्रणालीशी मार्च २०२३ मध्ये विवाह झाला होता. लग्नाला अवघे सात महिने झाले होते. दोघांनी सुखी संसाराची स्वप्ने पाहिली होती, पण अपघाताने प्रमोद यांना हिरावून घेतले, त्यामुळे प्रणाली यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young engineer killed wife injured in collision with unknown vehicle ssp 89 ysh