यवतमाळ : एकतर्फी प्रेमात आकंठ बुडालेल्या तरूणाने आवडणाऱ्या तरूणीच्या घराचा शोध घेऊन मोबाईच्या युगात पत्राद्वारे तिचे जगणे मुश्कील केले. शहरातील एका २० वर्षीय तरुणीला गेल्या १० महिन्यांपासून हा त्रास सुरू होता. तिच्या घराच्या पत्त्यावर अश्लील लिखाण असलेले पत्र येत होते. वारंवार घडणाऱ्या प्रकाराला कुटुंबीय वैतागले. बदनामीच्या भीतीने ते कुटुंब गप्पच होते. मात्र, हा त्रास वाढल्यानंतर या तरूणीने अखेर नारी रक्षा समितीला मदत मागितली. अविरत शोधानंतर हस्ताक्षरावरून त्या तरूणाचा शोध लागला आणि तरूणीसह नारी रक्षा समितीच्या सदस्यांनी त्याला चांगलीच अद्दल घडवली.

अलीकडे मोबाईल क्रमांक शोधून मुलींच्या छेडखानीचे प्रकार वाढत चालले आहे. मात्र आऊटडेटेड झालेला पत्र पाठविण्याचा प्रकार वापरून या तरूणाने तरूणीस त्रास देण्यास प्रारंभ केला. केवळ यवतमाळ शहरातूनच नव्हे तर विविध शहरांतून, गावातून या तरूणीच्या घरच्या पत्याळरवर गेल्या १० महिन्यांपासून अश्लील भाषा असलेल्या पत्रांचा ओघ सुरूच होता. पत्र नेमके कोण पाठवतोय, याचा शोध लागत नव्हता. हा तरूण तरूणीच्या शिकवणी वर्गातील शिक्षिकेलाही तरूणीची बदनामी करणारे पत्र पाठवू लागला. यात कुणाची मदत मिळू शकेल, याची चाचपणी मुलीने केली असता, यवतमाळातील नारी रक्षा समितीचे नाव पुढे आले. समितीचे अध्यक्ष विनोद दोंदल, शिला इंगोले यांनी त्या मुलीची भेट घेवून तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वासन दिले. तिच्याकडून गेल्या वर्षभरातील सर्व तपशील गोळा केला. ती कोण्या मित्रांना भेटली, कुठे गेली ही माहिती तिच्याकडून घेतली. तेव्हा एक वर्षापूर्वी घराजवळ राहणाऱ्या एका ३५ ते ४० वयोगटाच्या तरुणाने वाढदिवसानिमित्त तिला चॉकलेट व फुले दिल्याची माहिती समोर आली. शिकवणी वर्गापर्यंतही त्याने तिचा पाठलाग केला. मात्र, कधीही ती त्याच्यासोबत बोलली नव्हती.

Nagpur police arranged mother daughter reunion in pune
नागपूर पोलिसांनी घडवले पुण्यात मायलेकीचे मनोमिलन, आईच्या चेहऱ्यावर हास्य आणि लेकीचा आनंद गगनात मावेना
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Gym trainer ends life over dispute with boyfriend send video to mother don't leave him shocking Photo
PHOTO: सॉरी मम्मी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडून चूक केली…त्याला सोडू नको” आईला शेवटचा मॅसेज करुन संपवलं आयुष्य
Hyderabad Man Shoots At Girlfriend Father With Air Gun accused arrested
प्रेयसीला अमेरिकेला पाठवलं म्हणून संतापलेल्या प्रियकराने तिच्या वडिलांवर केला गोळीबार; कुठे घडली घटना?
Isha Koppikar first reaction on divorce with Timmy Narang
१४ वर्षांचा संसार मोडण्याचं कारण काय? पहिल्यांदाच बोलली ‘खल्लास गर्ल’; म्हणाली, “त्याने अत्यंत बेजबाबदारपणे…”
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत
readers reaction on different lokrang articles
पडसाद : हा तर बुद्धिभेद

हेही वाचा >>>विमानातून सोने आणण्यासाठी अशीही शक्कल; नागपूर विमानतळावर..

हाच तो तरूण असावा अशी शंका नारी रक्षा समितीने घेतली. तरूणीने त्या तरूणाला मोबाइलवर संपर्क साधून भेटावयास बोलावले. नारी रक्षा समितीने त्याची झाडाझडती घेतली, मात्र, त्याने ‘तो मी नव्हेच’, असा पवित्रा घेतला. परंतु, पत्र पाठविताना एका पत्रावर त्याने स्वहस्ताक्षरात पत्ता लिहून पुरावा मागे सोडला आणि हाच धागा पकडून पत्र पाठविणाऱ्या विकृत तरूणाचा शोध लागला. समितीच्या सदस्यांनी त्याला एका कागदावर पत्ता लिहिण्यास सांगितले. त्याचे हस्ताक्षर व तरूणीला आलेल्या पत्रावरील पत्यािकचे हस्ताक्षर जुळले आणि तरूणाला उपस्थितांनी चांगलाच बदडला. तरूणीवरील एकतर्फी प्रेमातून तिला अश्लील पत्र पाठवित असल्याची कबुली त्याने दिली. वर्षभर त्रस्त करून सोडणारा ‘चेहरा’ समोर आल्यानंतर त्या तरूणीनेही आपली शक्ती दाखवत त्याच्या थोबाडीत हाणल्या.

हेही वाचा >>>नागपूर : वारे सरकार! ऐन भर चौकात वर्दळीच्या ठिकाणी सेल्फी पॉईंट

पुन्हा पत्र न पाठविण्याची घेतली शपथ

या प्रकारानंतर आपण आता कोणत्याही मुलीला त्रास देणार नाही, अशी शपथ घेत त्या तरुणीच्या पाया पडून त्याने माफी मागितली. त्या विकृत तरुणाला वडील नसून, घरी आजारी आई आहे. घरची जबाबदारी त्याच्यावरच आहे. त्यामुळे मानवी दृष्टीकोणातून त्याला तंबी देवून सोडून देण्यात आल्याची माहिती नारी रक्षा समितीच्या सदस्यांनी दिली.