अमरावती : येथील गाडगेनगर पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील शोभानगर परिसरात एका युवकावर तिघांनी चाकूने हल्‍ला करून त्‍याची हत्‍या केल्‍याची घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्‍या सुमारास घडली. पूर्ववैमनस्‍यातून ही हत्‍या करण्‍यात आल्‍याचा संशय पोलिसांनी व्‍यक्‍त केला आहे. रोहित रतन पाल (१९, रा. मांडवा झोपडपट्टी) असे मृत युवकाचे नाव आहे.

रोहित पाल हा शोभा नगर परिसरातील एका पानटपरीनजीक सकाळी ११ वाजताच्‍या सुमारास मित्रासोबत बोलत उभा होता. त्‍याचवेळी तीन हल्‍लेखोर तेथे पोहचले. त्‍यांनी अचानकपणे रोहितवर चाकूने वार करण्‍यास सुरूवात केली. या जीवघेण्‍या हल्‍ल्‍यात रोहितचा जागीच मृत्‍यू झाला. हल्‍लेखोर लगेच पळून गेले. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्‍थळी पोहचून तपास सुरू केला. जुन्‍या वैमनस्‍यातून रोहितची हत्‍या करण्‍यात आली असावी, असा संशय पोलिसांनी व्‍यक्‍त केली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्‍ही तपासण्‍याचे काम हाती घेतले आहे.

Bala Nandgaokar meet Devendra Fadnavis
Bala Nandgaokar : बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; म्हणाले, “त्यांनी मला पाठिंबा…”
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच नाना पटोलेंच्या विधानाची मोठी चर्चा; म्हणाले, “मी आणि देवेंद्र फडणवीस…”
Maharashtra Assembly Election Rebel Candidates Results in Marathi
Maharashtra Assembly Election Rebel Candidates Results : ‘या’ ३५ बंडखोरांनी महायुती-मविआची चिंता वाढवली, निवडणुकीच्या निकालावर परिणाम होणार?
South Nagpur constituency, votes women South Nagpur, South Nagpur voting,
दक्षिण नागपूरमधील महिलांची वाढलेली मते निर्णायक
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
Prakash Ambedkar on government formation
Vanchit Bahujan Aghadi : निकालाआधीच वंचितचा मोठा निर्णय, पाठिंब्याबाबतची भूमिका जाहीर!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

हेही वाचा…दक्षिण नागपूरमधील महिलांची वाढलेली मते निर्णायक

विधानसभेच्‍या निवडणुकीसाठी २० नोव्‍हेंबर रोजी मतदान पार पडले. शनिवारी मतमोजणी होणार आहे. त्‍यादृष्‍टीने पोलीस यंत्रणा बंदोबस्‍ताचे नियोजन करीत असतानाच शहरात पुन्‍हा एकदा युवकाच्‍या हत्‍येची घटना समोर आली आहे. गेल्‍या महिन्‍यात एकापाठोपाठ सात जणांच्‍या हत्‍येने अमरावती शहर हादरून गेले होते. त्‍यातील काही हे अल्‍पवयीन होते, तर मारेकरी देखील अल्‍पवयीन आहेत. युवकांमधील ही गुन्‍हेगारी वृत्‍ती रोखण्‍याचे आव्‍हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

गेल्‍या महिन्‍यात २१ तारखेला रात्री उशिरा बालगृहातून नुकत्‍याच सुटलेल्‍या १७ वर्षीय मुलाची हत्‍या करून त्‍याचा मृतदेह गडगडेश्‍वर मंदिर परिसरात फेकून देण्‍यात आला होता. ऑक्‍टोबर महिन्‍यातील हत्‍येची ही सातवी घटना असल्‍याने कायदा व सुव्‍यवस्‍थेचा मुद्दा चर्चेत आला होता. खोलापुरी गेट पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीत ही घटना घडली होती. साहिल पंजाबी असे मृत मुलाचे नाव होते.

हेही वाचा…दहा महिन्‍यांत रेल्‍वे रुळावर २ हजार ३८८ मृत्‍यू ; मध्‍य रेल्‍वेचे ‘मिशन झिरो डेथ’ काय?

साहिल पंजाबी याचा दोन ते तीन महिन्‍यांपुर्वी एका युवकासोबत वाद झाला होता. दोन्‍ही गटातील युवकांनी हा वाद मिटवण्‍यासाठी राजापेठ परिसरात एक बैठक घेतली होती. पण, त्‍यावेळीही पुन्‍हा वाद उफाळून आला आणि साहिलने एका युवकावर चाकूने वार केला होता. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी साहिल याला ताब्‍यात घेऊन बालसुधारगृहात ठेवले होते. साहिल हा बालसुधारगृहातून बाहेर पडला होता. २१ ऑक्‍टोबरला रात्री त्‍याची हत्‍या करण्‍यात आली होती