लोकसत्ता टीम

नागपूर : एका मित्राच्या घरी दारू पार्टी सुरु असताना एकाने “तुझ्या बहिणीशी माझे प्रेमप्रकरण सुरु असून आम्ही अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापीत केले आहेत” असे म्हटले. त्यामुळे चिडलेल्या तीन तिघांनी मित्राचा दगडाने ठेचून खून केला. ही थरारक घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास अंबाझरीतील पांढराबोडी परिसरत उघडकीस आली.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप

सागर नकुल नागरे उर्फ (२७, सुदाम नगरी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली. आरोपी वीर विनोद थापा (१८, सुदामनगर) , अजित संतन नेताम (२६, सूदामनगर) आणि सुरेश मनोहर यादव (२५, अंबाझरी) अशी आरोपींची नावे आहेत.

आणखी वाचा-नागपुरात चिकनगुनियाचा उच्चांक, नागरिक त्रस्त; महापालिका म्हणते…

सागर नागले आणि आरोपी वीर, अजित आणि सुरेश हे सोमवारी रात्री १०:३० वाजता बंटी उइके या मित्राच्या घरात दारू पार्टी करीत बसले होते. पार्टी रंगात आल्यानंतर सागर नागले याने वीर थापाशी हुज्जत घातली. “तुझ्या मामे बहिणीशी माझे गेल्या एका वर्षापासून प्रेम संबंध आहेत, आही अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत. तुझी बहीण मला भेटायला रात्री माझ्या घरी येते. तुझ्या बहिणीचे माझ्यावर प्रेम असून आम्ही लवकरच पळून जाऊन लग्न करणार आहोत” असे म्हणाला.

त्यामुळे वीर याला राग आला. त्याने सागरला समजावण्याचा प्रयत्न केल. मात्र तो समजत नव्हता. त्यामुळे रागाच्या भारत वीर आणि त्याच्या दोनही मित्रांनी सागरला मारहाण केली. त्याला प्रेमसंबंध तोडण्यास सांगितले. पण तो मानायला तयार नव्हता. त्यामुळे तिघांनीही सागरच्या डोक्यात दगड, गट्टू घालून खून केला. सागरला रक्ताच्या थारोळ्यात लोळवल्यानंतर आरोपी पळून गेले. आरडाओरडा ऐकून शेजारी झोपेतून उठले. त्यांनी घरात जाऊन बघितले तर सागर हा मृतावस्थेत पडून दिसला. नागरिकांनी अंबाझरी पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला.

आणखी वाचा-अमरावतीत शिवसेना शिंदे गटाच्‍या जिल्‍हा प्रमुखावर गोळीबार; कारची काच फुटली….

आरोपींना दोन तासात अटक

वीर, अजित आणि सुरेश हे तिघेही अंबाझरी तलावावर पळून गेले. तेथे त्यांनी पुन्हा दारू ढोसली. पोलिसांनी आरोपींचे लोकेशन काढून तिघांनाही अटक केली. आरोपींनी खून केल्याची कबुली दिली आहे.

Story img Loader