लोकसत्ता टीम

नागपूर: सातव्या वर्गात शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलीला पाण्याच्या टाकीवर नेऊन बलात्कार केला. हा प्रकार कुणालाही सांगितल्यास आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. अंकित उर्फ प्रज्वल हिरालाल पाटील (२०) रा. एमआयडीसी असे आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, एमआयडीसी परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेच्या १३ वर्षीय मुलीला आरोपी अंकितने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्याशी ओळख वाढवली आणि संधी साधून १२ मे रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास आरोपी हा मुलीला एमआयडीसी परिसरातील एका पाण्याच्या टाकीजवळ घेऊन गेला. मुलीला शारीरिक संबंधाची मागणी केली.

हेही वाचा… नागपूर : विवाहित प्रेयसीवर बलात्कार

तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतरही आरोपीने तिला पाण्याच्या टाकीवर घेऊन जात तिच्यावर बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कुणाकडे काहीही सांगितल्यास आई-वडिलांना मारण्याची धमकी दिली. दरम्यान मुलगी तेथून घरी गेल्यावर तिची प्रकृती खालावली. तिच्या पालकांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, मुलीने घडलेला प्रसंग सांगितला.

हेही वाचा… अमरावती विभागातील धरणांमध्‍ये ४३ टक्‍के पाणीसाठा

यानंतर पालकांनी थेट एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुध्द तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपीविरुध्द गुन्ह्याची नोंद करुन त्याला अटक केली आहे.

Story img Loader