लोकसत्ता टीम

गोंदिया: सडक अर्जुनी येथील एक्वा ॲडव्हान्चर वॉटर पार्कमध्ये नयनपुर डूग्गीपार तरणताळ येथे बॉल पासिंग खेळत असताना झालेल्या किरकोळ वादातून बाचाबाची नंतर एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेतील गंभीर तरुण पंकज नुतेंद्र बिसेन (२४) रा. कुडवा, गोंदिया याला उपचाराकरिता गोंदिया येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यावर रविवारी मध्यरात्री तीन शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती डूग्गीपर ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिंगणजुडे यांनी दिली. डूग्गीपर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी सडक अर्जुनी येथील वॉटर पार्क मध्ये तुमसर आणि गोंदियातील तरुणांचे वेग वेगळे गट मौज मस्ती करण्याकरिता गेले होते.

Ranveer Allahabadia and Samay Raina
यूट्यूबर रणवीर अलाहबादिया व समय रैनाविरोधात महाराष्ट्र सायबर विभागाकडून गुन्हा ; वक्तव्य प्रकरणी दुसरा गुन्हा
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Gujarat Police officer son robbed in pune news
पुणे: गुजरातमधील पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाला नदीपात्रात लुटले
pune koyta attack news
पुणे : बिबवेवाडीत तोडफोड करणाऱ्या आरोपीविरुद्ध आणखी एक गु्न्हा, तरुणावर कोयत्याने वार
kawad village bhiwandi wada road theft attempt failed
बंगल्यात चोरी करण्यासाठी चोरट्यांची टोळी जीपगाडीने आली पण मार खाऊन गेले
Mumbai crime
मुंबई : आरोपीचा न्यायालातून पळून जाण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
40 year old construction worker arrested for sexually assaulting eight year old boy in Bijlinagar of Chinchwad
पिंपरी : चिंचवडमध्ये आठ वर्षीय मुलावर अत्याचार
Gondia, School van accident, School van ,
गोंदिया : स्कुलव्हॅनला अपघात, १३ विद्यार्थी जखमी

दरम्यान स्विमिंग पूल मध्ये बॉल पासिंग खेळत असताना त्यांच्यात किरकोळ वाद झाला, बाचाबाची नंतर सदर तरुण पळून जाण्याच्या बेतात असताना तुमसरच्या तरुणांनी त्याला कार पार्किंग परिसरात बेदम मारहाण केली. यात तो जागीच बेशुद्ध पडला त्याला त्याच्या मित्रांनी उपचाराकरिता गोंदियातील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

व्हिडिओ सौजन्य- लोकसत्ता टीम

हेही वाचा… चंद्रपूर : “खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण होऊ देऊ नका”; पालकमंत्र्यांचे विविध यंत्रणांना निर्देश, म्हणाले..

या प्रकरणी रविवारी रात्रीच मॉन्टी ओमप्रकाश जैसवाल (३०), प्रभाकर कान्हा गुर्वे (३९) ,भूषण रमेश बिसेन (२७),जीवन गोविंदा डहाके (४४) सर्व रा. तुमसर जि. भंडारा यांना डूग्गीपार पोलिसांनी अटक केली आहे. गंभीर जखमींचा लहान भाऊ फिर्यादी प्रतीक नुतेंद्र बिसेन (२३) याच्या तक्रारी वरुन डूग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जनार्दन हेगडकर करीत आहेत.

Story img Loader