नागपूर : प्रेमसंबंधातून गर्भवती राहिलेल्या तरुणीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. बदनामीच्या भीतीपोटी मध्यरात्रीच्या सुमारास नागपुरातील वांझरा ले- आऊटकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला फेकून पळ काढला. पहाटेच्या सुमारास ते बाळ फिरायला जाणाऱ्या एका व्यक्तीच्या नजरेस पडले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी बाळाला ताब्यात घेऊन त्याच्या आईचा शोध घेतला. बाळाची आई न मिळाल्यामुळे पोलिसांनी अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटेच्या सुमारास यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वांझरा ले- आऊटमधील अब्दूल रशिद यांच्या घरामागील रस्त्यावर एक नवजात बाळ रडत असल्याचे सकाळी फिरायला निघालेल्या रहमत खान यांना आढळून आले. त्यांनी त्या दिशेने धाव घेतली. एका पिवळ्या रंगाच्या कापडात एक दिवस वय असलेली चिमुकली दिसली. आजुबाजूला कुत्र्यांची गर्दीसुद्धा दिसली. त्यामुळे त्यांनी लगेच कुत्र्यांना पिटाळून लावले आणि पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. यशोधरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश खुणे यांनी लगेच पोलिसांचे एक पथक रवाना केले. सहायक पोलीस निरीक्षक मेघा गोखरे आणि पोलीस कर्मचारी सपना राणे हे घटनास्थळावर पोहचले. रडत असलेल्या त्या चिमुकलीला मेघा गोखरे यांनी कवेत घेतले. बाळाला कापडाने स्वच्छ करुन लगेच रुग्णालयात रवाना केले. घटनास्थळावरील पंचनामा करीत नागरिकांकडे चौकशी केली. त्या चिमुकलीच्या आईचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. वस्तीत अनेक ठिकाणी फिरुन बाळाबाबत माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाळाच्या आईचा पत्ता न लागल्यामुळे त्यांनी त्याला अनाथालयात दाखल केले. या प्रकरणी बाळ जन्माची लपवणूक केल्याप्रकरणी अज्ञात तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला. सध्या बाळ सुखरुप असून त्याची देखरेख अनाथालयात करण्यात येत असल्याची माहिती ठाणेदार रमेश खुणे यांनी दिली. या बाळाचा जन्म एका अविवाहित असलेल्या तरुणीच्या घरी झाला असून बदनामी होऊ नये म्हणून त्या तरुणीने बाळ रस्त्यावर फेकल्याची चर्चा परिसरात आहे.

हेही वाचा…नागपुरात दरवर्षी विधिमंडळाचे अधिवेशन घेण्याबाबत यशवंतराव चव्हाणांचीभूमिका काय होती ?

हे बाळ मला दत्तक द्या हो…

एक दिवस वय असलेले बाळ सापडल्यानंतर वस्तीत राहणारे एक दाम्पत्य तेथे पोहचले. त्या निपुत्रिक दाम्पत्यांनी पोलिसांकडे बाळाचा ताबा देण्याची विनंती केली. ‘साहेब…मला लेकरु नाय हो, साहेब… मला या लेकराला मला द्या..मी चांगला सांभाळ करेल.’ अशी विनवणी करीत होती. मात्र, पोलिसांनी कायद्याची अडचण असल्याचे सांगितले. त्यामुळे दाम्पत्य निराश झाले.