यवतमाळ : जिल्ह्यात सामाजिक चिंतेचा विषय ठरलेल्या ‘कुमारी मातां’ची कशी फरफट होते हे सांगणारी संतापजनक घटना मारेगाव तालुक्यात उजेडात आली. कुमारी माता म्हणून समाजाकडून अवहेलना सहन करीत असलेल्या एका २७ वर्षीय तरुणीस नोकरीचे आमीष दाखवून मध्यप्रदेशात नेण्यात आले. तेथे तिच्यावर अत्याचार करून तिचा दीड लाख रुपयांत सौदा केला आणि तिची विक्री केली.
तरुणीने प्रसंगावधान राखून आपल्या मुलीस माहिती दिली आणि हे प्रकरण उजेडात आले. या प्रकरणी पीडित तरुणीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यावरून चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने मारेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. पीडित तरुणी ही कुमारी माता असून आपल्या ११ वर्षीय मुलीसह मारेगाव येथे भाड्याने राहते. ती रोजमजुरी करून उदरनिर्वाह करते. ती चांगल्या नोकरीच्या शोधात होती.
हेही वाचा – अकोल्यात ६१२ जणांनी तब्बल ५.१७ कोटींची वीज चोरली
काही दिवसांपूर्वी तिची भेट दोन महिलांशी झाली. यातील एक मारेगाव तालुक्यातील तर दुसरी भद्रावती येथील रहिवासी आहे. त्यांनी तिला मध्यप्रदेशातील उज्जैन येथे असलेल्या एका कंपनीत लावून देण्याचे आमीष दाखवले. चांगला पगार मिळणार असल्याने पीडिता उज्जैन येथे जाण्यास तयार झाली. मुलीला नवोदयची परीक्षा होईपर्यंत आजीकडेच राहा, असे सांगितले. १२ एप्रिल रोजी त्या दोन महिलांनी पीडितेस मध्यप्रदेशमधील जावरा जि. रतलाम येथे नेले. तेथे त्यांनी पीडित तरुणीला जीतू माली नामक एका इसमाला दीड लाख रुपयांमध्ये विकल्याची तक्रार आहे.
जीतू माली याने पीडितेला एका खोलीत बंद केले. तिथे तो तिच्यावर रोज अत्याचार करायचा. नकार दिल्यास तिला जीवे मारण्याची धमकी द्यायचा. आपली फसगत झाली हे पीडितेच्या लक्षात आले. मात्र तिला पळून जाता येत नव्हते. दरम्यान, पीडितेने संधी साधून आपल्या ११ वर्षीय मुलीस फोनवर ही माहिती दिली. तिने घडलेला प्रकार आजीला सांगितला आणि ही घटना उजेडात आली. पीडितेच्या आईने तात्काळ चंद्रपूर येथील रामनगर पोलीस ठाणे गाठले व या प्रकरणी तक्रार दाखल केली.
हेही वाचा – सावधान! अवकाळी पावसाचे संकट कायम; आजपासून पुन्हा नागपूरसह विदर्भाला तडाखा बसण्याचा इशारा
रामनगर पोलिसांनी पीडिता मारेगाव येथील असल्याने हे प्रकरण मारेगाव पोलिसांकडे वर्ग केले. मारेगाव पोलिसांनी आरोपी नारायण शेडमाके, बननाबाई आत्राम दोघेही रा. गोंडबरांडा, ता. मारेगाव, रियाबाई रा. भद्रावती जि. चंद्रपूर व जीतू माली रा. पिडसावा, ता. जावरा (मध्यप्रदेश) यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. ठाणेदार राजेश पुरी यांनी तरुणीच्या शोधात एक पथक तातडीने मध्यप्रदेश येथे पाठवले. आरोपींना अटक केल्यानंतरच या प्रकरणातील माहिती समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.