लोकसत्ता टीम

गडचिरोली : ‘फेसबुक’वर झालेल्या मैत्रीचे नंतर प्रेमात रूपांतर झाले, एकमेकाच्या साथीने पुढील आयुष्य जगण्याच्या आणाभाका घेतल्या. पण भूतकाळ लपविल्याच्या रागातून प्रेयसीची ओढणीने गळा आवळून हत्या केली. गडचिरोली जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या पोर्ला येथील खुनाचा अवघ्या २४ तासात उलगडा करण्यात गुन्हे शाखेला यश आहे. निखील दिवाकर मोहुर्ले (२२,रा.वैरागड) असे आरोपीचे नाव आहे.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
pune police commissioner amitesh kumar
“४५० ठिकाणचे CCTV, अपहरणासाठी वापरलेली कार अन्…”, पोलीस आयुक्तांनी सांगितलं सतीश वाघ यांच्या मारेकऱ्यांना कसं पकडलं?
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात

शहरापासून १६ किलोमीटर अंतरावरील पोर्ला येथील जंगलात अनोळखी युवतीची ओढणीने गळा आवळून हत्या केल्याची खळबजनक घटना २२ डिसेंबरला दुपारी १२ वाजता उघडकीस आली होती. मृत युवती अर्धनग्न अवस्थेत होती, शिवाय घटनास्थळी दारुची रिकामी बाटली आढळली होती, त्यामुळे या घटनेचे गूढ वाढले होते.

आणखी वाचा-धक्कादायक! ४८ हजारांची लाच; महिला रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सचिन वासेकर ‘एसीबी’च्या जाळ्यात

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी तातडीने चार पथके नेमून तास गतिमान केला. चंद्रपूरच्या रामनगर ठाणे हद्दीतून एक युवती बेपत्ता असल्याची माहिती पुढे आली, त्यानंतर मृत युवतीची ओळख पटली. ती बीए प्रथम वर्षात शिकत होती तर निखीलचे बीएसस्सीर्पंत शिक्षण झालेले असून सध्या तो वाद्यकलावंत म्हणून काम करतो. वैरागडमधून २२ डिसेंबरला रात्री पोलिसांनी त्यास बेड्या ठोकल्या. सुरुवातीला त्याने टाळाटाळ केली, पण पोलिसी खाक्यापुढे त्याचा निभाव लागला नाही. नंतर त्याने संपूर्ण थरारपट उलगडला.

आणखी वाचा-अमरावती : लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने तरुणीची बदनामी, विनयभंग करून धमकी

मृत युवती व निखील यांची दीड वर्षांपासून मैत्री होती. फेसबुकवर त्यांची ओळख झाली होती, त्याचेरुपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता,पण आपले जिच्यावर प्रेम आहे तिच्या आयुष्यात आधी एक युवक होता, ही बाब निखीलला कळाल्यानंतर दोघांत बिनसले. ही माहिती का लपवून ठेवली, यावरुन निखीलने तिच्याशी वाद घातला होता. अखेर त्याने तिला थंड डोक्याने संपविले. गुन्हे शाखेचे निरीक्षक उल्हास भुसारी, सहायक निरीक्षक राहुल आव्हाड, उपनिरीक्षक नीलेशकुमार वाघ, श्रीकांत बोईना, प्रशांत गरफडे, कृष्णा परचाके, दीपक लोणारे, माणिक निसार, माणिक दुधबळे, सतीश कत्तीवार, मनोहर तोगरवार, गडचिरोली ठाण्याचे पो.नि. अरुण फेगडे , उपनिरीक्षक विशाखा म्हेत्रे, भाऊराव बोरकर यांनी ही कारवाई केली.

Story img Loader