नागपूर : गंगाजमुनातील काही तरुणींना ग्रामीण भागातील हॉटेल, ढाब्यावर नेऊन देहव्यापार करवून घेण्यात येत आहे. खापरखेड्यातील गुप्ता नावाच्या युवकाने आईच्या मदतीने गंगाजमुनातील तरुणींकडून देहव्यापार सुरु केला होता. ग्रामीण पोलिसांनी छापा घालून दोन तरुणींना ताब्यात घेतले तर तिघांना अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आरोपी अजय हनुमानप्रसाद गुप्ता, मावसभाऊ राहुल तिलकचंद गुप्ता आणि आई चंदा गुप्ता हे तिघेही खापरखेड्यातील जयभोलेनगर-चनकापूर येथे राहतात. आपल्या घरात तिघांनाही देहव्यापार सुरु केला होता. त्यासाठी त्यांनी गंगाजमुनातील दोन तरुणींना घरी आणले होते. त्यांना ग्राहकाप्रमाणे पैसे देऊन वेश्याव्यवसाय सुरु केला होता. गंगाजमुनातील दोन्ही तरुणी अजयने घरी मुक्कामी ठेवल्या होत्या. गावातील आणि पंचक्रोशीतील आंबटशौकीन तरुणांची अजयच्या घरी नेहमी गर्दी असायची.

हेही वाचा >>> चंद्रपूर: जंगलात युवकाची दगडाने ठेचून हत्या

तसेच अजय हा काही तरुणी देहव्यापारासाठी ढाब्यावरही पाठवित होता. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख ओमप्रकाश कोकाटे, बट्टूलाल पांडे, नाना राऊत, विनोद काळे, प्रमोद भोयर, नीतू खोब्रागडे, कविता बचले यांनी सोमवारी छापा घातला. या छाप्यात गुप्ता कुटुंबाला ताब्यात घेतले तर घरात देहव्यापार करताना दोन तरुणींनाही ताब्यात घेतले. खापरखेडा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.