चंद्रपूर : ब्रम्हपुरी शहरामधील नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या तरुणींची छेड काढणाऱ्या एका मजनूला एका तरुणीने धाडस दाखवत पोलिसांच्या ११२ या टोल फ्री क्रमांकावर फोन केला. लगेच ब्रह्मपुरी पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधत काही तासांतच मजनूला पकडून गजाआड केले.  त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुधवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान ब्रह्मपुरी वखार महामंडळाजवळून एक तरुणी आपल्या राहत्या घरून महाविद्यालयाकडे जात असताना एका मजनूने तिच्या मागून मोटारसायकलने येऊन तिला अश्लील स्पर्श करून तिची छेड काढली. पीडित मुलगी घाबरून ओरडली असता त्याने पळ काढला.

हेही वाचा >>> बुलढाणा: धक्कादायक! हळद लागताच अल्पवयीन मुलीने प्रियकरासह ‘फिनाईल’ प्राशन केले अन्…

 परंतु, एवढ्यावरच हा मजून थांबला नाही. पुढे जाऊन त्याने परत खेड रोडवर दुसऱ्या तरुणीची छेड काढली. परंतु या तरुणीने लगेच स्वतःला सावरून त्याच्या मोटारसायकलचा नंबर लक्षात ठेवला व पोलिसांच्या ११२ या फोन केला. ब्रम्हपुरी पोलिसांनी त्वरीत हालचाली करीत पीडित मुलीशी संपर्क साधला. परिवहन ॲपवरून या मोटारसायकलचा क्रमांकाचा शोध घेऊन आरोपीचाही शोध घेतला. नरेश सुरेश दिवटे (२७, रा. पारडगाव, ता. ब्रह्मपुरी) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत ठवरे करीत

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young women teasing youth arrest by the police nagpur news rsj 74 ysh