यवतमाळ : घरात नवीन नवरी आलेली, पाहुण्यांची वर्दळ आणि दारापुढे पोलिसांची गाडी थांबते. पोलीस दारात बघताच नवरा मुलगा हादरून जातो. त्यानंतर जे घडते त्याने सर्व कुटुंब, नवी नवरी, पाहुणे सारेच संतप्त होतात. या प्रकारानंतर संबंध एकीशी ठेवून घरोबा दुसरीशी करणाऱ्या तरुणाची तिसऱ्याच घरात अर्थात कोठडीत रवानगी करण्यात आली. दारव्हा तालुक्यातील एका गावात ही घटना घडली.

स्वप्नील वानखेडे, असे आरोपीचे नाव आहे. आरोपी स्वप्नीलने एका गावातील अल्पवयीन तरुणीस लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्षांपासून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तिच्याशी प्रेमाच्या आणाभाका घेत लग्नाची हमीही दिली. मात्र, १४ डिसेंबरला स्वप्नील दुसऱ्याच तरुणीसोबत बोहल्यावर चढला. ही बातमी कळताच त्याच्यासोबत प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या तरुणीने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली व स्वप्नीलविरुद्ध तक्रार दिली.

Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Bhajepar gram panchayat won over 1 crore in prizes under various government schemes
गावकऱ्यांच्या परिश्रमाने ग्रामपंचायत झाली कोट्यधीश…
Two youths from Motala taluk along with international Attal gang robbed National Bank in Telangana state
तेलंगणा बँक दरोड्याचे ‘बुलढाणा कनेक्शन’ ! दोन आरोपी मोताळा तालुक्यातील
Village liquor makers arrested in Wadachiwadi area Pune news
वडाचीवाडी परिसरात गावठी दारू तयार करणारे गजाआड; चार हजार लिटर गावठी दारु, १२ हजार लिटर रयासन जप्त
Koyta Ganga, Pimpri-Chinchwad, Koyta Ganga news,
पिंपरी-चिंचवडमध्ये कोयता गँगाचा पुन्हा उच्छाद
Nagpur Guardian Minister, Devendra Fadnavis,
नागपूरच्या पालकमंत्रीपदावरून तर्कवितर्क
Ner Taluka, groom marriage, groom Ner bullock cart ,
यवतमाळ : शेतकरी नवरदेवाने घोड्यावरून नव्हे तर बैलबंडीवरून काढली लग्नाची वरात, स्वत: धुरकरी बनलेल्या युवकाचे पंचक्रोशीत कौतुक

हेही वाचा – वर्धा : दोन पोलीस निलंबित तर दोघांची बदली, काय आहे प्रकरण वाचा…

पोलिसांनी तत्काळ त्या गावात जाऊन दुसरीसोबत नवीन संसाराची स्वप्ने रंगविणाऱ्या आरोपीस ताब्यात घेतले. घरात नवीन नवरी, घरात हळद फिटण्यापूर्वीच आरोपीवर कोठडीत जाण्याची वेळ आल्याने या प्रकरणाची परिसरात चर्चा रंगली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा – नागपूर : बाजारगावातील दारुगोळा बनविण्याच्या कारखान्यात स्फोट, ९ ठार, ३ गंभीर जखमी

ही कारवाई पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी, सुनील राठोड, सुरेश राठोड, रामराव राठोड, सलीम पठाण, शरद सावळे यांनी पार पाडली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनंजय रत्नपारखी करीत आहे.

Story img Loader