भंडारा : किशोरवयीन मुलीसोबत अश्लील छायाचित्र काढून ते समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत मागील चार वर्षापासून अनैतिक संबंध स्थापित केल्याचे धक्कादायक प्रकरण साकोली तालुक्यात उघडकीस आले आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.चार वर्षांपूर्वी आरोपी हर्षदीप मुकुंद नंदेश्वर (१९, रा. बांपेवडा ) आणि पीडीतेची एका लग्न समारंभात भेट झाली होती.

यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. दरम्यान, हर्षदीपने मुलीसोबत अश्लील छायाचित्र काढून घेतले. यानंतर मुलीला सतत धमकी देत शारीरिक संबंध स्थापित करुन पीडितेचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. एक दिवस हर्षदीप पीडित मुलीच्या घरी गेला ती एकटी असल्याची संधी साधून गैव्यवहार करण्यास सुरुवात केली. मुलीच्या आईने हा सर्व प्रकार बघितला आणि मुलीसोबत थेट पोलीस स्टेशन गाठले. पीडितेच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी हर्षदीप नंदेश्वरला अटक केली.

Story img Loader