नागपूर : मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त कैद्यांना गांजा पुरविणारी टोळी यापूर्वी पकडल्या गेली होती. त्यात दोन तुरुंगरक्षकांचाही समावेश होता. मात्र, पुन्हा एकदा गांजा कारागृहात पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न फसला. पोलिसांनी एका युवकाला २५ ग्रँम गांजासह न्यायालय परीसरातून अटक केली. करण विनोद पाटील (२४, बेझनबाग, जरीपटका) असे आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा >>> वर्धा: मागणी असणाऱ्या ‘ या ‘ बियाण्याची आता कृषी खात्याच्या निगराणीत विक्री, प्रसंगी कंपनीवर कारवाई

Father and son imprisonment, imprisonment beat police,
मुंबई : कर्तव्या बजावणाऱ्या पोलिसांना मारहाण करणे महागात, पिता-पुत्राला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा
Daily Horoscope 21st October 2024 Rashibhavishya in Marathi
२१ ऑक्टोबर पंचांग: मेष, सिंहसह ‘या’ राशींची इच्छापूर्ती…
Shilpa Shetty, Raj Kundra, Shilpa Shetty house,
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना घर जप्तीपासून तूर्त दिलासा
dhangar reservation issue
आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक; आंदोलकांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून सुरक्षा जाळीवर मारल्या उड्या
slaughterhouse, Bhayander, Narendra Mehta,
भाईंदर : …तर पालिका मुख्यालयावरुन उडी मारणार, कत्तलखान्याविरोधात नरेंद्र मेहता आक्रमक
Badlapur case, school trustees Badlapur case,
बदलापूर प्रकरण : …तर शाळेच्या विश्वस्तांना अद्याप का शोधू शकला नाहीत ? उच्च न्यायालयाचा पोलिसांना संतप्त प्रश्न
Two policemen arrested for kidnapping and demanding ransom nagpur
पोलिसांना झाले तरी काय ? अपहरण करुन खंडणी मागणाऱ्या दोन पोलिसांना अटक
female police attacked in police station with sharp blade in ulhasnagar
उल्हासनगरमध्ये महिला पोलिसाला पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

करण पाटील हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर हत्याकांडाचा गुन्हा दाखल आहे. त्याचा भाऊसुद्धा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत आहे. मंगळवारी पाचपालीतील कुख्यात गुुंड कालू याची न्यायालयात हजेरी होती. त्यामुळे करण पाटील हा सहा फुग्यात गांजा भरून न्यायालय परिसरात उभा होता. कालूमार्फत कारागृहात गांजा पोहचविण्यात येणार होता. पोलिसांना बघून करण लपला होता. त्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलीस हवालदार सुनील तिवारी यांनी पाठलाग करून करणला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असताना गांजा आढळून आला. कालू हा गुप्तांगात फुगे भरून कारागृहात गांजा नेणार होता, अशी माहिती आरोपीने पोलिसांना दिली. ही कारवाई पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, उपनिरीक्षक ज्ञानदेव तायडे, भूजंगराव फाटे, सुनील तिवारी, केशव बेलसरे यांनी केली.