भंडारा : महाराष्ट्र मेटल पावडर कंपनी प्रशासनाच्या मनमर्जी कारभाराला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार भंडारा तालुक्यातील गोपीवाडा येथे आज उघडकीस आला. मोरेश्वर उत्तम भोयर (३२, रा. मारेगाव, गोपीवाडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. मोरेश्वरची दीड एकर शेती कंपनी प्रशासनाने घेतली होती. शेतीचा मोबदला म्हणून मोरेश्वरला कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, अनेक दिवसांपासून नोकरी न दिल्याने मोरेश्वरने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. मोरेश्वरच्या आत्महत्येमुळे गावकरी संतापले. त्यांनी मोरेश्वरचा मृतदेह कंपनीसमोर ठेवला. यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून कंपनी प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले होते. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. 

Story img Loader