नागपूर : बुटीबोरी येथे प्रस्ताविक कामगार कल्याण रुग्णालय उभारण्यात दिरंगाई होत असून त्याचा फटका कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना बसत आहे. हे रुग्णालयात लवकरात लवकर सुरू व्हावे म्हणून युवक काँग्रेसने बुटीबोरी येथे गुरुवारी आंदोलन केले. प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत व प्रदेश सरचिटणीस मुजीब पठाण यांच्या नेत्वृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी रुग्णालयाच्या प्रस्तावित जागेवर प्रतिकात्मक स्वरूपात रुग्णावर उपचार करण्यात आले. १० वर्षापूर्वी तत्कालीन काँग्रेस सरकारने बुटीबोरी एमआयडीसीतील कामगारांची संख्या लक्षात घेता  २०० खाटांचे रुग्णालाय मंजूर केले होते. त्यासाठी आवश्यक निधीसुद्धा मंजूर केला होता. दरम्यान, केंद्रातील सरकार बदलले. तेव्हापासून ९ वर्षांचा कार्यकाळ लोटला, पण रुग्णालय उभे राहू शकले नाही.

Story img Loader