मित्रांसोबत अंबाझरी तलावावर फिरायला आलेल्या १२ वर्षीय मुलाला पोहण्याचा मोह आवरता आला नाही. त्या मुलाचा पोहताना बुडून मृत्यू झाला. शौर्य तुकाराम कोहळे (१२, रा. लोखंडेनगर) असे मृत मुलाचे नाव आहे. गेल्या १० महिन्यांतील अंबाझरी तलावातील हा बारावा बळी आहे, हे विशेष. शौर्य हा शनिवारी दुपारी दोन वाजता वस्तीतील चार मित्रांसह अंबाझरी तलावावर गेला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चौघेही पाण्यात उतरले. शौर्य याला पोहणे येत नव्हते तरी तो खोल पाण्यात गेला. तो बुडायला लागला. त्यामुळे त्याच्या तीनही मित्रांनी आरडाओरड केली. परंतु, त्याला कुणीही मदत केली नाही. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान अंबाझरी तलावावर पोहचले. त्यांनी शौर्यचा शोध घेतला. परंतु, त्याचा मृतदेह मिळून आला नव्हता. रविवारी सकाळी शौर्यचा मृतदेह तरंगताना आढळून आला. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली