नागपूर : आईचा मृत्यू झाल्यानंतर नैराश्यात गेलेल्या एका अभियंता असलेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नंदाजीनगरात उघडकीस आली आहे. आर्यन संजय राऊत (१९) असे मृत मुलाचे नाव आहे.

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ भारतीय सैनिकांच्या फाशीबद्दल चूप का?

हेही वाचा – कालेश्वरम प्रकल्प म्हणजे ‘केसीआर फॅमिली एटीएम’, राहुल गांधींचे टीकास्र; मेडीगड्डा धरणाला भेट

कोतवाली हद्दीतील शिवाजी नगर पोलीस चौकी मागे असलेल्या नंदाजी नगर येथे राहणारा आर्यन राऊत हा मेकॅनिकल इंजिनिअरींगचे शिक्षण घेत होता. २०२२ मध्ये त्याची आई मरण पावल्यापासून तो नैराश्यात वावरत होता. ३१ ऑक्टोबरला सायंकाळी त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी संजय चिंदुजी राऊत (५०) यांनी दिलेल्या सुचनेवरून कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Story img Loader