बुलढाणा : बुलढाणा-चिखली राज्य मार्गावर आज झालेल्या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. बुलढाणा नजीकच्या येळगाव नजीक एका शैक्षणिक संस्थेची बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन ही दुर्घटना घडली. आज बुधवारी, ११ डिसेंबर रोजी झालेल्या या दुर्देवी अपघातात येळगाव जवळील आश्रम शाळेजवळ ही घटना घडली. अपघातात ठार झालेला तरुण हा बुलढाणा तालुक्यातील खूपगाव येथील रहिवासी असून जिवन इंगळे असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलढाणा नजीकच्या सागवान येथील शिवसाई ज्ञानपीठ संस्थेची बस आणि मोटरसायकलची समोरासमोर धडकून हा अपघात झाला. अपघात झाल्यावर घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली. अपघातात दुचाकीची मोडतोड होऊन युवक जागीच दगावला. काही जवाबदार नागरिकांनी घटनेची माहिती बुलडाणा शहर पोलिसांना दिली. शहर पोलिसांच्या पथकाने तात्काळ येळगाव गाठून घटनास्थळचा पंचनामा केला. वृत्त लिहिपर्यंत पोलीस कारवाई सुरू असल्याने पोलीस कारवाईचा तपशील मिळू शकला नाही.

हेही वाचा…आकाशात १३, १४ डिसेंबरला उल्कावर्षाव; पृथ्वी लहान-मोठ्या कणांजवळून…

उपाय योजनांची गरज

दरम्यान मलकापूर सोलापूर राज्य महामार्ग असल्याने या मार्गावर पहाटे ते रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. बुलढाणा शहराचा विस्तार आता येळगाव पर्यंत होत असून या मार्गावर मोठ्या शैक्षणिक संस्था, शाळा, महा विद्यालये आहेत. प्रवासी, वाहनांची संख्या आणि दुतर्फा वाहतुकीचे प्रमाण जास्त असल्याने रस्ता अपुरा पडत आहे. अनेक ठिकाणी प्रामुख्याने येळगाव परिसरात रस्त्यालगत असलेली अतिक्रमणे देखील वाहतुकीत मोठी अडचण ठरत आहे. वाहतुकीचा मुख्य मार्ग असल्याने या मार्गाने प्रवासी, माल वाहतूक मोठ्या संख्येने होत आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने आणि वाहतूक विभागाने तातडीने उपाय योजना करणे आवश्यक ठरत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth died on the spot in an accident today on buldhana chikhali state highway scm 61 sud 02