यवतमाळ : लग्नानंतर तब्बल १४ वर्षांनी ‘तो’ वडील झाला. आज पत्नी आणि नवजात बाळाला आणण्यासाठी ‘तो’ निघाला. मात्र त्यांना घ्यायला पोचण्याआधीच काळाने डाव साधला. रस्त्यावरील ट्रकला अडकून सिमेंटचा वीज खांब अंगावर कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. संतोष राजाराम पासटकर (३५, रा. हिंगणी, ता. माहूर, जि. नांदेड) असे मृताचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> ‘जिथे टी, तिथे मी’… आज आंतरराष्ट्रीय चहा दिन

ही घटना आज सकाळी फुलसावंगी येथे माहूर मार्गावर घडली. संतोष पासटकर हा फुलसावंगी येथे कापड खरेदी करून दुकानाच्या बाहेर आला. तेव्हा एक सिमेंट वाहतूक करणारा ट्रक (क्र. टिएस २६- टी २१०५) हा माहूरकडे जात असताना त्या ट्रकला रस्त्यात बॅनर बांधलेली दोरी अडली. क्षणात तो वीज खांब तुटून संतोषच्या डोक्यावर पडला. त्या खांबाला असलेले लोखंडी अँगल संतोषच्या डोक्यात घुसल्याने तो घटनास्थळीच गतप्राण झाला. नागरिकांनी त्याला फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.