वाशीम : जिल्ह्यातील मालेगाव तालक्यातील मेडशी जवळ असलेले मोरणा धरण काठोकाठ भरले आहे. अशा स्थितीत या धरणात पोहण्याची हौस एका युवकाच्या जिवावर बेतली. गोकसावंगी येथील भागवत जहागीर काळे (२५) या युवकाचा धरणात पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना ३० ऑगस्ट रोजी घडली.

हेही वाचा >>> ‘स्वाईन फ्लू’च्या आणखी १५ मृत्यूंवर शिक्कामोर्तब ; ऐन सणासुदीत वाढली चिंता

भागवत काळे मोरणा धरणात पोहण्यासाठी गेला होता.  उशिरापर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो दिसून आला नाही. गावकऱ्यांनी मोरणा धरणवरही शोधाशोध केली. मात्र, धरण शंभर टक्के भरले असल्याने गावकऱ्यांना त्याचा शोध घेणे कठीण होते. यामुळे आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले. पाच तासांच्या शोधमोहिमेनंतर भागवतचा मृतदेह बाहेर काढण्यात पथकाला यश आले.

युवकाच्या मृत्यूमुळे गोकसावंगी गावात हळहळ व्यक्त होत आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नद्या, नाले आणि तलाव तुडुंब भरून वाहत आहेत. या धोक्याच्या ठिकाणांपासून दूर राहा, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत काही जण केवळ हौसेपोटी आपला जीव गमावत आहे.

Story img Loader