अकोला : मूळ अकोल्यातील १९ वर्षीय तरुणाने मराठा आरक्षणासाठी पुण्यात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. अभय गजानन कोल्हे, असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – दिवाळीत रेल्‍वेने प्रवास करताना ‘या’ वस्‍तू घेऊन जाऊ नका; रेल्‍वेने दिला इशारा

हेही वाचा – सिगारेटचा झुरका अन् रेल्वेचा दंडुका! रेल्वेगाडीत धुम्रपान करणाऱ्यांकडून साडेअठरा हजारांचा दंड वसूल

अभय कोल्हे हा मूळ अकोला शहरातील डाबकी रोड भागातील रहिवासी होता. त्याच्या वडिलांचे करोना काळात निधन झाले. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्याला आई व बहिणीची चिंता होती. त्यात आरक्षण मिळत नसल्याने तो विवंचनेत होता, असे सांगण्यात येत आहे. अभयने पुणे येथील चाकण भागात २ नोव्हेंबर रोजी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास आत्महत्या केली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे सांत्वन करून तरुणाच्या बहिणीचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले.