नागपूर : सीमा भागात तैनात तोफा, रणगाडे, रडार आणि शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन नागपुरात बघण्याची संधी मिळाल्याने युवक-युवतींची अलोट गर्दी मानकापूर क्रीडा संकुल परिसरात उसळली होती. लष्काराद्वारे सादर करण्यात आलेल्या साहसी कवायती बघून मुला-मुलींसह पालकही आनंदीत झाले होते. भारतीय लष्कराने मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल परिसरात २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान शौर्य संध्या या नावाने शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. तीन दिवसात दीड लाख लोकांनी हे प्रदर्शन बघितले.

या प्रदर्शनाचे खास वैशिष्टे म्हणजे स्वदेशी बनावटीचे “वज्र” हे अलिकडेच लष्करात असलेल्या तोफेचा समावेश आहे. तसेच कारगिल युद्धा महत्त्वाची भूमिका बजावलेल्या स्विडन बनावटीची बोफोर्स तोफ प्रक्षेकांना ३६० अंशात फिरवून दाखवण्यात आली. प्रेक्षक एकेका स्टॉलवर जावून रणगाडे, तोफ, रायफल, अग्णिबाण, काही वेळातच तयार करण्यात येणारी पूल (ब्रिज) याबद्दल उत्स्कुतेने माहिती घेत होते. या प्रदर्शनात टी ९० भीष्म रणगाडे, नागपुरात तयार झालेले पिनाका रॉकेट लाँचर आकर्षण होते. याशिवाय येथे लष्कराचे छोटेखानी संग्रहालय देखील आहे. सध्या ड्रोनचा शस्त्र म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. लष्कराच्या या प्रदर्शनात नागास्त्र-२ आणि रुद्रास्त्र सारखे ड्रोनवर आधारित अस्त्र युवकांच्या आकर्षणाचे केंद्र होते.

हेही वाचा…टिपेश्वर अभयारण्यातील ‘त्या’ वाघाची फासातून सुटका, शिकाऱ्यांनी लावला होता…

सीमेवर लढणारा जवान आणि युद्धात वापरण्यात येणारी शस्त्रे प्रत्यक्षात पाहिल्यानंतर आपण किती सुरक्षित आयुष्य जगतो, याचा प्रत्यय आला. देशाच्याच नाही तर आपल्या सुरक्षेसाठी हे जवान किती खरतड आयुष्य जगतात. एवढी मोठे शस्त्रे ते कशी हाताळतात हे प्रत्यक्षात दिसून आले. हा उपक्रम प्रत्येक शहरात व्हायला हवा, ज्यामुळे किमान तरुणवर्ग सैन्यात भरती होण्यासाठी प्रेरित होईल -संजय देशमुख

Story img Loader